राज्य उत्पादन शुल्क कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य उत्पादन शुल्क कारवाई
राज्य उत्पादन शुल्क कारवाई

राज्य उत्पादन शुल्क कारवाई

sakal_logo
By

४६३८४

सावंतवाडीजवळ गोवा बनावटीची
सव्वा दोन लाखांची दारू जप्त
कोल्हापूर ः बेकायदेशीररित्या मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी मोटार चालकास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले. श्रीकृष्ण कदम (वय ३२, अणाव परिसर, ता. कुडाळ, सिंधुदुर्ग) असे संशयिताचे नाव आहे. पथकाने सव्वा दोन लाखांच्या मद्यासह मोटार जप्त केल्याची माहिती विभागाने दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती, अशी शेर्ले गावाच्या हद्दीतून मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती पथकास मिळाली. पथकाने येथे छापा टाकला. पथकाला मोटारीतून बेकायदेशीरित्या २ लाख २६ हजार रुपयांचा मद्यसाठा मिळून आला. त्यासह मोटार असा सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. कारवाई उपायुक्त बी. एच. तडवी यांच्या आदेशाने दुय्यम निरीक्षक एस. जे. ढेरे, एस. एस. गोंदकर व अंलदार सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांनी केली.

३०६४
महिला अधिकाऱ्याचा कार्यालयातच मृत्यू
आजरा ः आजरा महसूल विभागाच्या महिला अधिकारी अंजना सर्जेराव पाटील (वय ५२) यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने कार्यालयातच मृत्यू झाला. पाटील महसूल सहाय्यक पदावर कार्यरत होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता कार्यालयात आल्या. कामकाज करीत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. थोड्या वेळात त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला. कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यांच्यावर निपाणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91513 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..