महापालिका प्रशासकांना शिक्षक पदोन्नतीप्रश्नी निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका प्रशासकांना शिक्षक पदोन्नतीप्रश्नी निवेदन
महापालिका प्रशासकांना शिक्षक पदोन्नतीप्रश्नी निवेदन

महापालिका प्रशासकांना शिक्षक पदोन्नतीप्रश्नी निवेदन

sakal_logo
By

महापालिका प्रशासकांना
शिक्षक पदोन्नतीप्रश्नी निवेदन

इचलकरंजी, ता. २९ ः महापालिका प्राथमिक शाळांतील पटसंख्या व शिक्षक संख्या निश्चीत झाल्यानंतरच पदोन्नतीची कार्यवाही करावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रशासक सुधाकर देशमुख यांना दिले आहे. महापालिकेच्या ३६ प्राथमिक शाळांमध्ये सुमारे ७४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कमी पटसंख्येवरुन ११ शाळांचे अन्य शाळांत समायोजन केले आहे. त्यामुळे २२ शिक्षक जादा आहेत. त्यांची जादा पट असलेल्या शाळांमध्ये शिक्षण संघटनांच्या दबावामुळे बदली केलेली नाही. त्यामुळे हे शिक्षक काम न करताच सध्या वेतन घेत आहेत. शासन निर्णयानुसार पटसंख्या व शिक्षक संख्या निश्चीत झाल्यानंतरच पदोन्नतीची कार्यवाही करणे उचीत ठरणार असून याबाबतचे आदेश प्रशासन अधिकारी यांना द्यावेत, अशी मागणी मोरबाळे यांनी निवेदनात केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91573 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..