कोतोली येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोतोली येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद
कोतोली येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

कोतोली येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

sakal_logo
By

2503
कोतोलीत रक्तदान शिबिराला प्रतिसाद
माजगाव ः कोतोली (ता. पन्हाळा)येथील आदर्श क्रीडा तरूण मंडळ यांच्या वतीने सागर शिवाजी पाटील यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिरा झाले. ६५ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना पर्यावरण रक्षणासाठी झाडाचे रोप भेट दिले. उपक्रमास सीपीआर रक्तपेढीचे सहकार्य लाभले. सुभाष पाटील, राहुल शेवरे, संदिप आळवेकर,संतोष पाटील,किरण पाटील,नितीन पाटील,शशीकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कसबा बोरगाव येथे विकास कामांचा प्रारंभ
बाजार भोगाव ः पन्हाळा तालुक्यातील कसबा बोरगाव येथे पन्हाळा पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या तीन लाखांच्या विकास कामांचा प्रारंभ सरपंच दिनकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पी. डी. पाटील यांनी मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये विकास कामाच्या माध्यमातून तसेच सामान्य लोकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन मतदार संघात वेगळा ठसा उमटविला असल्याचे युवा नेते केदार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. सरपंच दिनकर जाधव, उपसरपंच सागर संकपाळ, ग्रा.पं .सदस्य शिवाजी पाटील, जयश्री कांबळे, दीपाली संकपाळ, सीमा खोत, मनिषा धुमाळ, रेखा खोत, तसेच गजानन पाटील, बाजार समितीचे माजी संचालक उत्तम धुमाळ, के. टी. पाटील, महादेव पाटील, हैबती पाटील, सागर खोत, एम. वाय. कांबळे, विठ्ठल चौगुले, बाजीराव खोत, निवृत्ती धुमाळ, राम मुळीक, शशिकांत पाटील, ग्रामसेविका माधुरी नाईक आदी उपस्थित होते.

2656
कळेत धर्मराज संस्थेतर्फे लाभांश वाटप
कळे ः संस्थेची वाटचाल प्रगतिपथावर असून संस्थेच्या २९ वर्षांच्या काळात प्रथमच लाभांश वाटप केल्याची माहिती अध्यक्ष गणपती भगवान पाटील यांनी दिली. येथील श्री. धर्मराज सहकारी सेवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. १ कोटी २४ लाख वार्षिक उलाढाल झाली असून गतवर्षीपेक्षा पंचवीस लाख वाढ झाली आहे. यावर्षी १ लाख २९ हजार रुपये नफा झाल्याची माहिती सचिव सागर मोळे यांनी दिली. चार टक्केप्रमाणे एक लाख रुपये लाभांश वाटप झाले. माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. जयवंत पाटील, सचिन पाटील, सागर देसाई यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी बाळकृष्ण पाटील, उदय नाईक, संजय पाटील, बाजीराव पाटील, यशवंत माळवे, सुवर्णा संजय पाटील, अमित गुरव, अक्षय बोरगे, शहाजी पाटील,सदाशिव देसाई, गणेश नाईक आदींसह सभासद उपस्थित होते. उपाध्यक्ष मारुती कोकणे यांनी आभार मानले.

03182
अशोक डवंग यांची निवड
पुनाळ : माजनाळ (ता. पन्हाळा) येथील अशोक तुकाराम डवंग यांची शिवसेनेच्या पन्हाळा तालुका उपप्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यांना याकामी जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार चंद्रदीप नरके, तालुका प्रमुख सुरेश पवार यांचे सहकार्य लाभले.

2182
02181
मनोहर पाटील अध्यक्षपदी
कोडोली : येथील पन्हाळा तालुका माध्यमिक शिक्षण संस्था सेवकांची पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर पाटील तर उपाध्यक्षपदी भिकाजी जाधव यांची एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजणे होते. लालासो पाटील, राजाराम पाटील, तानाजी जमदाडे, तानाजी चौगले, ज्ञानदेव पाटील, वर्षा साळोखे, वामन पाटील,दत्तात्रय जाधव, संतोष लोखंडे, जीवन पाटील, वैभव गुरव, सुनिता पठाणे, सुवर्णा शिंदे , राहूल भोई, रघुनाथ सावंत यांच्यासह चिटणीस तोडकर, पांडूरंग लोहार जाधव उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91575 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..