केएमटी मार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटी मार्ग
केएमटी मार्ग

केएमटी मार्ग

sakal_logo
By

गणेशोत्सवानिमित्त शहरातील
केएमटी बसमार्गात बदल

कोल्हापूर, ता. २९ ः गणेशोत्सवानिमित्त ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत केएमटी बसेसच्या मार्गात बदल केला आहे.
स्टँडमार्गे येणाऱ्या पाचगाव, आर. के. नगर या बस लुगडी ओळमार्गे शाहू मैदान अशा न धावता सायन्स कॉलेज-बिंदू चौक-शाहू मैदान अशा जातील. शुगर मिलहून येणाऱ्या शिवाजी विद्यापीठ, कळंबा, आर. के. नगर या बस दसरा चौक-मुस्लीम बोर्डिंग-सायन्स कॉलेज-बिंदू चौक अशा जाणार आहेत. कागलहून राजारामपुरीमार्गे साळोखेनगर-आपटेनगर-कळंबा या बस रेल्वे फाटक-बागल चौक-उमा टॉकिज-शाहू मैदान अशा जातील. ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्याने व ५ सप्टेंबरला घरगुती गौरी-गणपती विसर्जन असल्याने सर्व मार्गांवरील नियमित बस संख्येत कपात केली आहे. ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असल्याने सर्व मार्गांवरील बस पूर्ण बंद राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91620 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..