महागाई भत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाई भत्ता
महागाई भत्ता

महागाई भत्ता

sakal_logo
By

कर्मचाऱ्यांना मिळाले महागाई भत्त्याचे ३ कोटी ४० लाख

कोल्हापूर, ता. २९ ः गणपती आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका व केएमटीच्या कर्मचाऱ्यांना आज प्रलंबित महागाई भत्ता देत प्रशासकांनी आनंदाची बातमी दिली. महापालिकेच्या कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ३ कोटी ४० लाखांची रक्कम आज जमाही झाली. केएमटी कर्मचाऱ्यांना येत्या पगारात रक्कम मिळणार आहे.
प्रलंबित महागाई भत्त्यासाठी महापालिका कर्मचारी संघाने वेळोवेळी प्रशासकांकडे मागणी केली होती. याबाबत निर्णय होत नसल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त व अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळावा अशी मागणी कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांनी केली होती. त्यानुसार आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महागाई भत्ता आदा करण्याचे आदेश दिले. २८०० कार्यरत कर्मचारी तसेच १६०० निवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आज रक्कमही जमा झाली. त्याचे मेसेज मोबाईलवर येताच कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला.

चौकट
केएमटी कर्मचाऱ्यांना बारा लाख
प्रशासकांनी केएमटी कर्मचाऱ्यांनाही ४८ टक्के थकीत महागाई भत्त्यापैकी १६ टक्के महागाई भत्ता तसेच पाच टक्के घरभाडे देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाढीव १२ लाख रूपये सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. सहाव्या वेतन आयोगातील ही थकीत रक्कम आहे. त्यातील रक्कम अशीच टप्प्याटप्प्याने मिळणार हे स्पष्ट झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91633 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..