मठमधील तरुणीचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मठमधील तरुणीचा खून
मठमधील तरुणीचा खून

मठमधील तरुणीचा खून

sakal_logo
By

टीपः swt२९३३.jpg मध्ये फोटो आहे.
४६४६१ - सायली गावडे
टीपः swt२९३४.jpg मध्ये फोटो आहे.
४६४६२ - गोविंद माधव

मठमधील तरुणीचा खून
वेतोरेजवळ मृतदेह; मैत्रिणीच्या पतीवर संशय
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २९ ः मठ-कणेवाडी येथील तरुणीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघड झाला. सायली यशवंत गावडे (वय २०) असे तिचे नाव आहे. आडेली आणि वेतोरे या गावांच्या हद्दीवर असलेल्या एका बागेत तिचा मृतदेह सापडला. ती शनिवारपासून बेपत्ता होती. पोलिसांनी या प्रकरणी तिच्या जवळच्या मैत्रिणीचा पती गोविंद ऊर्फ वैभव दाजी माधव (रा. परुळे) याला ताब्यात घेतले. प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून त्याने खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
सायली हिने परिचारिका प्रशिक्षण घेतले होते. ती कुडाळला एका रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून कामासाठी जात असे. ती दररोज कुडाळ ते मठ असा प्रवास करायची. शनिवारी सायंकाळी ती कुडाळहून घरी येत होती; मात्र उशिरापर्यंत घरी परतली नव्हती. यामुळे आईने पावणेआठच्या दरम्यान तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी तिने आपण ‘जिजू’सोबत आहे, पंधरा मिनिटांत घरी पोहोचते, असे सांगितले; मात्र ती परत आलीच नाही. नंतर तिचा मोबाईल बंद येत होता.
घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली; मात्र ती न सापडल्यामुळे रविवारी (ता. २८) सकाळी तिचे वडील यशवंत लवू गावडे यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याच दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास वेतोरे आणि आडेलीच्या सीमेवर एका तरुणाला सायलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी सायलीच्या घातपाताची शक्यता बळावली. डोक्याच्या मागील बाजूस दुखापत झाली होती. तोंडावर मारहाणीच्या खुणा होत्या. नाकातून रक्त आले होते. गळ्याभोवती काळा व्रण होता. तिचा गळा आवळून खून झाल्याचा संशय बळावला. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक अतुल जाधव, कॉन्स्टेबल सुरेश पाटील, योगेश वेंगुर्लेकर, बंटी सावंत आदींनी पंचनामा केला. जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके, स्थानिक गुन्हा अन्वषणचे निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक महेश घाग आदींनी घटनास्थळी माहिती घेतली.
सायलीशी शेवटचा संपर्क झाला, त्यावेळी तिने आपण ‘जिजूं’सोबत असल्याचे सांगितले होते. ती तिच्या जवळच्या मैत्रिणीचा पती गोविंद उर्फ वैभव माधव याला ‘जिजू’ म्हणत असे. पोलिसांनी काल रात्री माधव याच्यासह चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी माधव यानेच प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या कारणावरून तिला मारहाण करत ओढणीने गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिस निरीक्षक जाधव यांनी व्यक्त केला.
सायलीच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, आजी, काका असा परिवार आहे. घटना समजताच मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, मठ माजी सरपंच धोंडू गावडे, जया गावडे, अजित नाईक, संतोष परब आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.


२४ तासांत संशयित ताब्यात
सायलीचा मृतदेह शनिवारी रात्री अकराच्या सुमारास सापडला. यानंतर उपविभागीय अधिकारी सोळंके यांनी वेंगुर्लेत ठाण मांडून तपासाला गती दिली. पोलिस निरीक्षक जाधव, स्थानिक पोलिस तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सर्व शक्यता पडताळून सायली हिच्याशी पूर्वीही मैत्री असलेल्या काहींना ताब्यात घेतले. गोविंद माधव यालाही ताब्यात घेत कसून चौकशी केली. यावेळी मुख्य संशयित तोच असल्याचे पुढे आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91641 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..