केएमटी बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटी बस
केएमटी बस

केएमटी बस

sakal_logo
By

46472

भंगारचा लिलाव करून
१९ बस दुरूस्त करा

म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनची मागणी
कोल्हापूर, ता. २९ ः केएमटीच्या निकृष्ट व बंद अवस्थेतील ३० बंद बसचा लिलाव करण्याबरोबरच भंगाराचा लिलाव करून येणाऱ्या रकमेतून १९ बस दुरूस्त कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत जुन्या बस खरेदी करू नये अशी मागणी म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनने निवेदनाद्वारे केली.
केएमटीने पुण्यातील १० वर्षे वापरलेल्या बस खरेदी करण्याचा विचार चालवला आहे. त्यातून केएमटी पुन्हा तोट्यात जाण्याची शक्यता निवेदनात वर्तवत युनियनने जुन्या १९ बस सुरू कराव्यात वा नवीनच बस खरेदी कराव्यात अशी मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे, २०१५ मध्ये खरेदी केलेल्या १४ तर २००७ मध्ये खरेदी केलेल्या ५ बस आहेत. त्या दुरूस्त केल्यास पुढील आठ वर्षे चालू शकतात. त्यासाठी ७६ लाखांची जरूरी आहे. बंद असलेल्या जुन्या ३० बसचा लिलाव करावा तसेच भंगारचा लिलाव करावा. त्यातून १९ बस दुरूस्त कराव्यात. तसेच काही सीएनजी वा इलेक्ट्रीकच्या नवीन बस खरेदी कराव्यात. कामगारांची देणी अजून शिल्लक असल्याने नफ्यातून ती देण्यात यावी. यावेळी थकीत महागाई भत्ता व घरभाडे भत्ता द्यावी, एक महिन्याचा पगार द्यावा अशी मागणीही केली. अध्यक्ष शशिकांत पाटील, तज्ज्ञ संचालक अनिल कदम, जनरल सेक्रेटरी इर्शाद नायकवडी, ज्ञानोबा शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91652 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..