शाहू कॉलेज मध्ये क्रीडा दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू कॉलेज मध्ये क्रीडा दिन
शाहू कॉलेज मध्ये क्रीडा दिन

शाहू कॉलेज मध्ये क्रीडा दिन

sakal_logo
By

शाहू कॉलेजमध्ये क्रीडा दिन
कोल्हापूर :   येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित क्रीडा क्षेत्रातील करियर संधी या विषयावर श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव यांचे व्याख्यान झाले. खेळामुळे अनेक संधी मिळतात. विद्यार्थ्यांनी एक ध्येय मनामध्ये ठेवावे आणि ध्येय पूर्तीसाठी अविरतपणे कष्ट करावे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी कष्ट आणि नियोजन महत्त्वाचे आहे. तरच यश मिळवता येते, असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. एल.डी कदम अध्यक्षीय मनोगतातून म्हणाले की, मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा दिवस साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांच्याकडे खूप खेळात चपळाई होती. त्यांना हॉकीचे जादुगार असे म्हटले जाते. खेळातील सर्वोत्तम यश यांच्याच कारकिर्दीत मिळाले. खेळावर श्रद्धा ठेवल्यास यश निश्चित मिळते. महाविद्यालयाच्या कला व कॉमर्स विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सिंधू आवळे, डॉ. व्ही. पी. नांगरे, सविता माजगावकर उपस्थित होते. प्रास्ताविक जी. एम. लवंगारे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91660 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..