हरतालिका व्रत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरतालिका व्रत
हरतालिका व्रत

हरतालिका व्रत

sakal_logo
By

46414

पारंपरिक पद्धतीने आज हरतालिका पूजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः ‘जय देवी हरतालिके, सखी पार्वती अंबिके...’ अशा माहोलात उद्या (मंगळवारी) घरोघरी हरतालिका पूजा होणार आहे.
परंपरेप्रमाणे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे पूजन केले जाते. दोन वर्षे कोरोनामुळे महिलांना हे व्रत प्रतीकात्मक पद्धतीने घरीच करावे लागले होते; मात्र यंदा यानिमित्ताने महिलांच्या आनंदाला आणखी उधाण येणार आहे. सामूहिक हरतालिका पूजनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा जागरही होणार आहे. दरम्यान, हरतालिका व्रतासाठी लागणाऱ्या विविध पत्री, फळे-फुलांसह मूर्ती खरेदीसाठी दिवसभर गर्दी राहिली.
बाप्पा, गौराई-शंकरोबासह यंदा विक्रेत्यांनी हरतालिकेच्याही आकर्षक मूर्ती उपलब्ध केल्या आहेत. पूजेवेळी वाळूची शंकराची पिंड करतात. अलीकडे वाळू सहज उपलब्ध होत नसल्याने विक्रेत्यांनी वाळूची पाकिटेही बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होती. हरतालिकेची मूर्ती, पत्री, वाळू आणि पूजा साहित्य असे एकत्र पॅकेजही विक्रेत्यांनी उपलब्ध केले. त्याशिवाय सोशल मीडियावरून ऑनलाइन विक्री करणाऱ्या लघुउद्योजकांनीही हरतालिका पूजा साहित्य घरपोच देण्याची व्यवस्था केली.

व्रत कशासाठी?
कुमारिका आणि विवाहित महिलांचे हे व्रत असून, परंपरेप्रमाणे दिवसभर हे व्रत करणाऱ्या कुमारिका व महिला दिवसभर काहीच खात नाहीत. त्यामुळे हे व्रत सर्वात कठीण मानले जाते. त्यामुळे या व्रतामागील मूळ पारंपरिक उद्देश कायम ठेवत बदलत्या जीवनशैलीनुसार उपवास करण्यावरही भर दिला जाणार आहे. मनाजोगा पती मिळावा आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी या व्रताची परंपरा बदलत्या काळातही कायम आहे. नव्या पिढीला या व्रताची माहिती मिळावी, यासाठी ते कसे करावे, परंपरा काय आहे, आदी माहिती आता सोशल मीडियावरूनही उपलब्ध होऊ लागली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91676 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..