निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

२३९८
आक्काताई घरपणकर
गारगोटी : आंबवणे (ता. भुदरगड) येथील आक्काताई शामराव घरपणकर (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त मुख्याध्यापक शामराव घरपणकर यांच्या त्या पत्नी होत.

३६७४
आब्बास मकानदार
कुंभोज : येथील आब्बास अहमदशहा मकानदार (वय ९०) यांचे निधन झाले. मुस्लिम समाजाचे ते ज्येष्ठ मार्गदर्शक होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. जियारत विधी मंगळवारी (ता. ३०) आहे.

३६७३
अतुल माळी
कुंभोज : येथील अतुल श्रीकांत माळी (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कुंभोज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत माळी यांचा तो मुलगा, तर माजी पंचायत समिती सदस्या निर्मला माळी यांचे ते पती होत. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ३०) आहे.

46459
अनुसया जानवेकर
कोल्हापूर : इचलकरंजी येथील अनुसया दशरथ जानवेकर (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुली, नातू, सुना असा परिवार आहे.

46460
छाया कामत
कोल्हापूर : घरकुल योजना, ताराबाई पार्क येथील छाया गजानन कामत (वय ६५) यांचे निधन झाले. केडीसीसी बँकेच्या त्या निवृत्त कर्मचारी होत्या. त्यांच्या मागे मुलगी, जावई असा परिवार आहे.

01792
गुणाबाई निकम
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील गुणाबाई कृष्णात निकम (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली, सून असा परिवार आहे.

07182
बाबासाहेब सनदी
घुणकी : येथील बाबासाहेब शमशुद्दीन सनदी (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. जियारत विधी बुधवारी (ता. ३१) सकाळी आहे.

01320
विष्णू ठाणेकर
इचलकरंजी : विष्णू दिनकर ठाणेकर (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली असा परिवार आहे.

01790
जनाबाई कळेकर
कोल्हापूर : उंड्री (ता. पन्हाळा) येथील जनाबाई शंकर कळेकर (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ३०) आहे.

46477
दीपक यादव
कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील दीपक पांडुरंग यादव (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ३०) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91692 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..