अपघातात मयत बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातात मयत बातमी
अपघातात मयत बातमी

अपघातात मयत बातमी

sakal_logo
By

अपघातातील व्यक्ति मयत कोल्हापूर : पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा), भोसले गल्ली येथील शिवाजी सरदार भोसले (वय ३१) या व्यक्तिचा २९ ऑगस्टला मानेवाडी फाटा (ता. करवीर) येथे अपघात झाला होता. अपघातात जखमी झाल्याने शिवाजी यांना बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. संग्राम भोसले यांनी या अपघाताची वर्दी करवीर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार २९ तारखेला करवीर पोलिस ठाण्यास जखमी झाल्याबाबतची वर्दी मिळाली होती. त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिस हेड कॉन्टेबल भिवटे यांनी सीपीआर रुग्णालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा तेथील डॉक्टरांनी संबंधित रुग्ण मयत झाल्याचे सांगितले. मृत व्यक्तिच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांवरुन नाव, पत्ता समजल्याने मृत व्यक्तिचा भाऊ संग्राम सरदार भोसले यांच्याशी संपर्क साधला.

्अपघातात व्यक्ति जागीच मृत
कोल्हापूर : वाशी नाका (ता. करवीर) येथील राजेंद्र गणपती कांबळे यांचा २९ तारखेला कासार कांडगाव हायस्कूलच्या अलिकडे अपघात झाला होता. यानुसार करवीर पोलिस ठाण्यात सृष्टी पार्क, फुलेवाडी येथील ड्रायव्हर भारत महादेव पोवार यांनी वर्दी दिली होती. २९ तारखेला भारत पोवार हे त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन राधानगरी येथे जात होते. तेव्हा वाशी गावच्या पुढील बाजूस कासार कांडगाव हायस्कूलच्या अलिकडे राजेंद्र कांबळे हे समोरुन मोटर सायकलने रस्त्याच्या डावी बाजूस येऊन ट्रकच्या डाव्या हेडलाईट जवळ ठोकर दिली. ते रस्त्यावर पडले. त्यामुळे ट्रकचे पुढील चाक त्यांच्या अंगावरुन गेले. ते जागीच मृत झाले. प्राथमिक तपास रविंद्र पाटील करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91699 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..