टोल फ्री पास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोल फ्री पास
टोल फ्री पास

टोल फ्री पास

sakal_logo
By

00965
‘अथणी शुगर्स’तर्फे वारसांना धनादेश
कडगाव : अथणी शुगर्स भुदरगड युनिटचे केनयार्ड कर्मचारी प्रकाश पाटील अपघातात मृत झाले होते. प्रशासनाने त्यांच्या पत्नी श्रीमती अश्विनी प्रकाश पाटील व मुलगा स्वयंम पाटील यांना नऊ लाख रुपयांचा धनादेश दिला. अपघातावेळी प्रशासनाच्या वतीने तत्काळ वारसांना एक लाख रुपये मदत केली होती. चीफ इंजिनिअर एस. एस. शिंगटे म्हणाले, ‘‘या पुढील काळातही आम्ही कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी राहू.’’ शेती अधिकारी एल. बी. देसाई, अधीक्षक बाबासाहेब देसाई, चीफ केमिस्ट प्रकाश हेदुरे, चीफ अकाउंटंट जमीर मकानदार, लेबर ऑफिसर कन्हैया गोरे, शशिकांत थोरवत, राजाराम आमते, शिवाजी खरुडे, सतीश पाटील, अविनाश गुरव, संताजी देसाई, दिलीप गायकवाड, अमृत कळेकर उपस्थित होते.


४००७
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना मदत द्या
कागल : तालुक्यामध्ये पावसामुळे अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामेही झाले आहेत; पण मदत मिळालेली नाही. शासनाने मदत तातडीने करावी, अशा आशयाचे निवेदन कागल तालुका शिवसेनेने नायब तहसीलदार रूपाली सूर्यवंशी यांना दिले. सोयाबीन, ऊस, भात पिकाचे नुकसान झाले आहे. विहिरींची पडझड झाली आहे व काही विहिरी गाळाने मुजल्या आहेत. त्यामुळे विहीर दुरुस्तीसाठी शासनाकडून मदत मिळावी. तसेच काही नागरिकांचे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, राजेंद्र साळुंखे, विजय आरेकर, स्वप्निल माने, प्रकाश पाटील, जयसिंग टिकले, तेजस मोरे, भैरू शेटके, कृष्णा गुरव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.


३१२१
बहिरेवाडीमध्ये रास्त धान्य दुकान
वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील एच. आर. जाधव सहकार समूहाने आमदार डॉ. विनय कोरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या रास्त धान्य दुकानाचे उद्‌घाटन वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते झाले. गावामध्ये एकाच ठिकाणी होणारी गर्दी व वाढती लोकसंख्या बघता ग्रामस्थांनी नवीन दुकानाची मागणी सरपंच शिरीषकुमार जाधव यांच्याकडे केली होती. सरपंच शिरीषकुमार जाधव यांनी आमदार कोरे यांची भेट घेऊन नवीन रास्त धान्य दुकानाचा प्रस्ताव मांडला. आमदार कोरे यांनी हा प्रस्ताव शासनाकडे सादर करून मंजूर केला. उपसरपंच राजेंद्र जाधव, ग्रामपंचायत सदस्य संपत कणसे, विजय कावळे, समूहाचे संचालक, पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

02501
देसाईवाडीत कासारी नदी घाटाची स्वच्छता
माजगाव ः पन्हाळा तालुक्यातील बोरगाव पैकी देसाईवाडी येथील उपसरपंच सागर संकपाळ यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील युवकांनी श्रमदानातून कासारी नदीकाठावरील दहा ट्रॉली गाळ व कचरा बाजूला करून घाटाची स्वच्छता केली. या घाटाचा गणेशोत्सव व दसरा उत्सव काळात, तसेच इतरवेळी नागरिकांना नियमित वापर होत असल्याने घाट स्वच्छता अभियानाचे कौतुक होत आहे.

2503
कोतोलीत रक्तदान शिबिराला प्रतिसाद
माजगाव ः कोतोली (ता. पन्हाळा) येथील आदर्श क्रीडा तरुण मंडळ यांच्या वतीने सागर शिवाजी पाटील यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर झाले. ६५ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना पर्यावरण रक्षणासाठी झाडाचे रोप भेट दिले. उपक्रमास सीपीआर रक्तपेढीचे सहकार्य लाभले. सुभाष पाटील, राहुल शेवरे, संदीप आळवेकर, संतोष पाटील, किरण पाटील, नितीन पाटील, शशिकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

03182
अशोक डवंग यांची निवड
पुनाळ : माजनाळ (ता. पन्हाळा) येथील अशोक तुकाराम डवंग यांची शिवसेनेच्या पन्हाळा तालुका उपप्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यांना याकामी जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार चंद्रदीप नरके, तालुका प्रमुख सुरेश पवार यांचे सहकार्य लाभले.

टोल माफीचे पास वाहतूक शाखेकडे
कोल्हापूर ः गणेशोत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्‍यांच्‍या वाहनांना टोलमाफीची घोषणा राज्‍य सरकारने केली आहे. कोकणाकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठीचे टोलमाफीचे पास शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे उपलब्‍ध झाले आहेत. तरी संबंधित वाहनधारकांनी येथून पासेस घेऊन जावेत, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91700 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..