चला ध्वनी प्रदुषणाचे विघ्न दूर करूया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चला ध्वनी प्रदुषणाचे विघ्न दूर करूया
चला ध्वनी प्रदुषणाचे विघ्न दूर करूया

चला ध्वनी प्रदुषणाचे विघ्न दूर करूया

sakal_logo
By

कानाचा आवाज फोटो
--

ध्वनिप्रदूषणाचे विघ्न रोखूया
---
चार वर्षांत जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे; पारंपरिकतेचा बाज जपत आनंदसोहळा करण्याची अपेक्षा
राजेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः गणपती विद्येची देवता, विघ्नहर्ता असेही म्हटले जाते. याच गणरायाच्या स्वागताला आणि विसर्जनालाही मोठ्या आवाजाची सिस्टिम हे प्रमुख आकर्षण बनले आहे. चार वर्षांचा आढावा घेतला असता परिक्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्यात ध्वनिप्रदूषणाच्या सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली; तर पुणे ग्रामीण विभागात यासंबंधीचा एकही गुन्हा नाही. आता या मोठ्या आवाजाचे विघ्न दूर करण्याचे साकडेच गणरायाला घालण्याची वेळ आली आहे. त्यानुसार यंदाचा गणेशोत्सव साजरा करून नवा आदर्श घालून द्यावा, अशी सार्वत्रिक अपेक्षा व्यक्त होत आहे.
गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा झाला पाहिजे. पण, उत्सवात ध्वनिप्रदूषण करू नका, यासंबंधीचे प्रबोधन पोलिसांकडून दरवर्षी केले जाते. पारंपरिक वाद्यात, पोलिसांच्या सूचनेचा आदर करीत शिस्तबद्ध मिरवणूक काढण्याची परंपरा अनेक मंडळांनी जपली आहे. पण, काही मोजक्याच घटकांकडून त्याचे पालन होत नाही. मागचा-पुढचा विचार न करता मिरवणुकीत सिस्टिमचा दणदणाट करण्याकडे या घटकांचा कल असतो. प्रबोधन करून जर कोणी एकत नसेल तर अशा घटकांवर पोलिस यंत्रणेकडून कारवाईचा बगडा उगारला जातो.
कोल्हापूर परिक्षेत्रात चार वर्षांत गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत एकूण ६१ गुन्हे दाखल झाले. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ४३ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापाठोपाठ सांगली १०, सोलापूर ग्रामीण पाच, तर सातारा येथे तीन गुन्ह्यांची नोंद झाली. ध्वनिप्रदूषणाचा शरीरावर परिणाम होतो. त्याचबरोबर कारवाईमुळे तरुणांच्या करिअरला धोका निर्माण होतो. याचा विचार प्रत्येकाने करावा. ध्वनिप्रदूषण रोखणे हे आपल्या हातात आहे. यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक वाद्यात साजरा करून ध्वनिप्रदूषणाचे विघ्न दूर होऊन यासंबंधीचा एकही गुन्हा नोंद होणार नाही, असा संकल्प करून तो सर्वांनी मिळून साध्य करूया.

46696
ज्येष्ठांसह लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून त्यांनाही उत्सवात सहभागी होता येईल, अशा ध्वनिमर्यादेचे पालन करून मिरवणुका काढल्या जाव्यात.
- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक

----

कोल्हापूर परिक्षेत्रात ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे

वर्ष कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर ग्रामीण पुणे ग्रामीण
*२०१८ ३२ ०८ -- ०२ --
*२०१९ ०५ ०२ ०३ ०३ --
*२०२० ०४ -- -- -- --
*२०२१ ०२ -- -- -- --
----------------------------------------------------------------------------------
एकूण ः ४३ १० ०३ ०५ ००

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91710 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..