कोल्‍हापूर : सौर ऊर्जेवर पाणी रे पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zilla parishad kolhapur
३९ वाड्यांच्या पाणी योजनांना सौर उर्जेचा आधार

कोल्‍हापूर : सौर ऊर्जेवर पाणी रे पाणी

कोल्‍हापूर : ग्रामीण पाणी योजनांच्या थकीत वीज बिलापोटी महावितरण अडचणीत आले आहेत. कोट्यवधीची थकीत बिले न भरल्याने खंडित केला जाणारा वीजपुरवठा आणि त्यातून होणारा नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळतो, मात्र याला फाटा देत जिल्‍ह्यातील ३९ वाड्या, वस्‍त्यांना जलजीवन मिशनमधून सौर ऊर्जेव्दारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ या निर्णयावर न थांबता १८ वाड्या-वस्‍त्यांना या योजनेतून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित गावांनीही काही भागांसाठी, गल्‍लीसाठी असा प्रयोग केल्यास मोठ्या प्रमाणात विजेची व पैशांची बचत होणार आहे.

जलजीवन मिशन योजनेतून प्रती माणसी ५५ लिटर पाणीपुरवठा केला जाणार आहे; मात्र हा पाणीपुरवठा करताना कमीत कमी विजेचा वापर कसा होईल, यासाठी प्रयत्‍न होणे आवश्यक आहे. अनेक गावांनी कोट्यवधींच्या योजना उभारल्या आहेत; मात्र वीज बिल परवडत नसल्याने त्या योजना एक तर बंद आहेत किंवा इतर स्‍त्रोतांचा वापर करून सुरू आहेत. बिलावर उपाय म्‍हणून जिल्‍ह्यातील ३९ वाडी, वस्‍तींवर केला आहे.

१८ गावांतील पाणी योजना सुरू...
आजरा -इटे (इटे रायवाडा), * भुदरगड-कोंडोशी (कोंडोशी हरिजन वस्‍ती), * कागल - बानगे ( बानगे, काळम्मावाडी), गलगले -(मालवाडी),
करड्याळ - (करड्याळ हरिजन वसाहत), मळगे बुद्रुक
(कमलाकरवाडी), म्‍हाकवे (चौगले वसाहत), पिराचीवाडी (गावठाण भोसले गल्‍ली), सुरुपली (मराठी शाळा), वडगाव (हरिजन वसाहत), * राधानगरी-आडोली (अडसूळवाडी), तळगाव(बेरकळवाडी), * शाहूवाडी -आकुर्ली (जिल्‍हा परिषद शाळा), भाडळे
(वटकरवाडी), निळे (धनगरवाडा), सरुड ( खामकरवाडी), उदगिरी (उदगिरी), येळवण (बौध्‍दवाडी).

येथे योजना प्रस्तावित
आजरा आवंडी (धनगरवाडा), मासेवाडी (देवालय परिसर), * भुदरगड पाटगाव (धनगरवाडा), शिवडाव (धनगरवाडा), *कागल वंदूर (जनगाटे मळा), *पन्‍हाळा आंबवडे (आंबेडकर वसाहत), जाखले (चौगले वसाहत), पणुरे (बामणवाडी) * राधानगरी म्‍हासुर्ले (मधाळवाडा) * शाहूवाडी मालेवाडी (तुपारेवाडी), सोनुर्ले (चिंचेवाडी), * शिरोळ दानोळी(रामोशी वसाहत), धरणगुत्ती (लामण वसाहत), तर ९ गावांतील वाडी, वस्‍तीवर सौर पाणी योजना प्रस्‍तावित आहे.

सौर योजनेचे फायदे
* २४ तास मुबलक पाणी
*विजेच्या खर्चात बचत
* वैयक्ति‍क व सार्वजनिक नळाने घरोघरी पाणी
* प्रदूषण विरहित तंत्रज्ञान

निसर्गाने सौर ऊर्जेचे मोठे वरदान दिले आहे, मात्र आपण त्याचा वापर करत नाही. मुळात सौर ऊर्जेचा वापर केल्याने विजेची बचत होतेच, मात्र विनाअडथळा २४ तास योजनेचा वापरही सौर ऊर्जेतून शक्य आहे. जिल्‍ह्यातील ३९ गावांनी हे सिद्धही केले आहे.
- संजयसिंह चव्‍हाण, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91715 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..