लाभार्थी वारसांना प्रोत्साहनपर रक्कम मिळेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाभार्थी वारसांना प्रोत्साहनपर रक्कम मिळेना
लाभार्थी वारसांना प्रोत्साहनपर रक्कम मिळेना

लाभार्थी वारसांना प्रोत्साहनपर रक्कम मिळेना

sakal_logo
By

लाभार्थ्यांचे वारस ‘प्रोत्साहन’पासून वंचित
सेवा संस्थेत तक्रारी; लाभार्थी असला तरी वारस म्हणून लाभ मिळण्याची मागणी
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : राज्य शासनाने प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक ५० हजारांपर्यंत रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एखादा शेतकरी मृत झाला असेल तर त्याच्या दुसऱ्या कर्जदार शेतकरी वारस मुलाला लाभ देण्यास अडचणी येत आहेत. वारस असणारा मुलगा किंवा मुलगीही प्रामाणिक कर्ज परतफेड करून प्रोत्साहनात्मक रकमेची लाभार्थी असेल तर त्यांना त्यांच्या वारसाचा लाभ मिळत नाही, अशा सभासदांच्या तक्रारी आहेत.
प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांच्या कर्जपरतफेडीला चालना देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे. ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे, अशा जिल्ह्यातील ५ लाख ४० हजार शेतकरी सभासदांच्या कर्जाच्या याद्या व त्यांच्या आधारकार्ड नंबरची लिंकिंग केले जात आहे.
१५ सप्टेंबरपासून ज्या-त्या प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. ही एक यंत्रणा सक्रिय आहे; पण त्याउलट एका संस्थेत मुलगा आणि वडील सभासद आहेत. त्या दोघांनीही कर्ज घेतले आहे. ते कर्ज वेळेत, प्रामाणिकपणे परतफेड केले आहे; पण वडिलांचे निधन झाले आहे. अशा मृत खातेदारांना मिळणारे प्रोत्साहनपर रक्कम त्याच्या वारसांना मिळाली पाहिजे. प्रत्यक्षात त्यांचा मुलगाही या योजनेचा लाभार्थी असल्याचे सांगून वारसांना या लाभापासून परावृत्त केले जात आहे. जर दोन खाती असतील तर एकाच खात्यावर रक्कम मिळणार आहे. त्या मुलाला त्यांच्या वडिलांनी परतफेड केलेल्या रकमेचा फायदा होत नाही, अशांनाही लाभ दिले पाहिजे, अशी मागणी होत आहे.


माझे वडील मृत आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे कर्ज परतफेड केले आहे. त्यांचा वारस म्हणून संस्थेत अर्ज केला; पण मी स्वत:ही लाभार्थी आहे, असे सांगून त्यांनी वडिलांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे नाकारले. मी स्वत: जरी लाभार्थी असलो तरीही वडिलांनी परतफेड केलेल्या कर्जाचा लाभ मिळाला पाहिजे.
- मोहन पाटील, शेतकरी

प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. एखादा शेतकरी मयत असेल आणि तो लाभार्थी आहे तर त्याच्या वारसाला ही रक्कम दिली जाते. पण एखादा शेतकरी स्वतः लाभार्थी असेल तर त्याला वारसाचे ५० हजार रुपये मिळू शकणार नाहीत, कारण ही रक्कम एक लाखापेक्षा जास्त होते.
-अमर शिंदे , जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91791 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..