कोणत्याही यशाला शॉर्टकट नसतो : बाबासाहेब आजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोणत्याही यशाला शॉर्टकट
नसतो : बाबासाहेब आजरी
कोणत्याही यशाला शॉर्टकट नसतो : बाबासाहेब आजरी

कोणत्याही यशाला शॉर्टकट नसतो : बाबासाहेब आजरी

sakal_logo
By

46578
गडहिंग्लज : झेप ॲकॅडमीच्या पालक मेळाव्यात बोलताना बाबासाहेब आजरी. शेजारी एम. एल. चौगुले, डॉ. आर. एस. निळपणकर, मीना रिंगणे, एस. एन. देसाई आदी.

कोणत्याही यशाला शॉर्टकट
नसतो : बाबासाहेब आजरी
झेप ॲकॅडमीत विद्यार्थी-पालक मेळावा
गडहिंग्लज, ता. १ : निश्‍चित ध्येय, वेळेचे नियोजन करून अभ्यास करा. शारीरिक व मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहा. जीवनातील कोणत्याही यशाला शॉर्टकट नसतो. यामुळे बदलासाठी नेहमी सज्ज राहावे, असा सल्ला पुणे विभागाचे निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी स्पर्धा परीक्षार्थींना दिला.
ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप ॲकॅडमीतर्फे आयोजित विद्यार्थी पालक मेळाव्यात ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. चौगुले म्हणाले, ‘‘गडहिंग्लज विभागातून अधिकाधिक क्लासवन अधिकारी घडावेत, यासाठीच ही ॲकॅडमी सुरू केली आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ॲकॅडमीचा लाभ घ्यावा.’’ प्राचार्य मीना रिंगणे यांनी ध्येयवादी, आशावादी राहून कष्टाची तयारी ठेवल्यास यश नक्कीच मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. पालकांतर्फे रमेश आमणगी, ईश्‍वर गुरव, विद्यार्थीतर्फे लक्ष्मी गुरव, विद्या देसाई, प्रेरणा वाजंत्री यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य एस. एन. देसाई यांनी प्रास्ताविकात झेपच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. प्रशिक्षक विवेक दड्डी, नीतेश रायकर, विजय पाटील यांनी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी व ॲकॅडमीतील सोयीसुविधांची माहिती दिली. प्रेरणा वाजंत्री यांनी सूत्रसंचालन केले. अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी आभार मानले. संचालक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, इंटेटचे समन्वयक प्रा. मनोहर गुरबे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक, प्रशिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91805 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..