शेतकरी संघ पतसंस्थेचा 12 टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी संघ पतसंस्थेचा 12 टक्के लाभांश
शेतकरी संघ पतसंस्थेचा 12 टक्के लाभांश

शेतकरी संघ पतसंस्थेचा 12 टक्के लाभांश

sakal_logo
By

शेतकरी संघ पतसंस्थेचा १२ टक्के लाभांश
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या सेवकांच्या पतसंस्थेच्या सभासदांना संस्थेला मिळालेल्या नफ्यातून १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी सहकारी संघ सेवकांची सहकारी पतसंस्थेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारणसभा झाली. यावेळी अध्यक्ष संजय निर्मळ बोलत होते. श्री निर्मळ म्हणाले, ‘‘पतसंस्थेची शंभर टक्के वसुली झाली आहे. भविष्यात सर्व कामे एकसंधपणे केली जातील. सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले जाईल.’’ खजिनदार दीपक निंबाळकर यांनी अहवाल सालामध्ये भागभांडवल, कर्ज व्यवहार, निधनोत्तर साहाय्य निधी व सभासद कल्याण ठेव व शैक्षणिक पुरस्कार याबद्दल माहिती दिली. यावेळी उपसभापती अख्तर अत्तार, सदस्य राजेंद्र पाटील, धनाजी पाटील, बी. एस. पाटील, रणजित खानविलकर, अनंत देसाई, सुषमा गुरव, शैला पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91811 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..