राजारामपुरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजारामपुरीत
राजारामपुरीत

राजारामपुरीत

sakal_logo
By

४६६५९

यंगस्टर्सनी साकारला
लोकमान्यांचा गणेशोत्सव
कोल्हापूर ः लोकमान्य टिळक यांनी १८९४ ला पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली. या साऱ्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी येथील यंगस्टर्सनी विशेष छायाचित्रणाची संकल्पना यंदा राबवली आहे. अभिनेता अमोल नाईक यांनी याची माहिती दिली. समाजात एकी निर्माण व्हावी आणि लोकसहभागातून विधायक कार्याला बळ मिळावे, या उद्देशाने उत्सवाला प्रारंभ झाला. संगीत मेळे, पोवाडे, कीर्तन, गायन आदी कार्यक्रमांवर भर दिला जायचा. पुढे सर्व जातीधर्मांचे लोक एकत्र येऊन उत्सव साजरे करू लागले. मी लहान असताना मंडळाच्या सजीव देखाव्यात भाग घेत होतो. तिथेच माझ्या अभिनयाच्या कलेची सुरुवात झाली. मैत्रीण व मेकअप आर्टिस्ट आणि डिझायनर स्वरा शेट्येने या साऱ्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी काहीतरी करण्याचा विचार मांडला आणि त्यातून हा विशेष छायाचित्रणाचा उपक्रम यशस्वी झाला. श्री प्रॉडक्शन फिल्म्सचे अक्षय पोतदार, सचिन कामत यांच्यासह सर्व टीमचा त्यासाठी सक्रिय सहभाग राहिला.

४५९७३
राजारामपुरीत साकारणार
श्रीकृष्ण जन्माचा देखावा
कोल्हापूर : राजारामपुरी येथील सहाव्या गल्लीतील तांत्रिक देखाव्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळाने ‘कथा श्रीकृष्ण जन्माची’ हा हलता तांत्रिक देखावा साकार केला आहे. देखाव्यात कंसाची काळ कोठडी उभा केली असून, सुरुवातीस आकाशवाणी होत देवी कंसाला सांगते की, देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल. जेव्हा श्रीकृष्णाचा जन्मा होतो. वासुदेव दरवाजा उघडून बाहेर येतात. १२ फुटांचा शेषनाग टोपलीत घेत जाणाऱ्या श्रीकृष्णा मागे येऊन उभा राहतो. याबरोबर कंस देवकीच्या मुलगीची हत्या करण्याचा प्रयत्न करतो, हे सर्व प्रसंग उभे केले आहेत. हा देखावा १० मिनिटे हालता असून, बहुतांश हालचाली हायड्रोलिक पंपावर होणार आहे. १५ तंत्रज्ञ आणि मंडळाचे कार्यकर्ते देखाव्याचे काम करत आहेत, असे मंडळाचे अध्यक्ष धनराज माने, उपाध्यक्ष विनायक शेनोळकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91855 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..