गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

46608
गडहिंग्लज : पर्यावरणपूरक गणशोत्सव साजरा करण्याबाबतचे निवेदन स्वरूप खारगे यांना देताना अंनिसचे पदाधिकारी.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे अंनिसचे आवाहन
गडहिंग्लज : घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गडहिंग्लज शाखेतर्फे करण्यात आले. याबाबत मुख्याधिकारी स्वरूप खारगे व पोलिस प्रशासनाला देण्यात आले. इको फ्रेंडली गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, फटाक्यांची आतषबाजी करू नये, साउंड सिस्टीमचा दणदणाट टाळावा, सार्वजनिक व घरगुती मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडात करावे व नदी-विहिरीतील पाण्याचे प्रदूषण टाळावे, ध्वनी, वायू प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी, समाजात शांतता, सुव्यवस्था व सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखावी यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, जिल्हा सल्लागार समिती सदस्य पांडुरंग करंबळकर, शाखा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे, शाखा प्रधान सचिव अशोक मोहिते यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. हिरण्यकेशी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील चौगुले यांची उपस्थिती होती.
----------------
46607
भडगाव : चैतन्य अपंगमती विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी अकलाक मुजावर, गणेश मांगले, अंकुश चव्हाण, विलशा कोकणे आदी.

अपंगमती विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
गडहिंग्लज : सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भडगावच्या चैतन्य अपंगमती विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. अकलाक मुजावर व जिल्हाध्यक्ष गणेश मांगले यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वप्नील राऊत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास अंकुश चव्हाण, विशाल कोकणे, सूरज वांगणेकर, वैभव शिवणे उपस्थित होते. प्रतिष्ठानचे जिल्हा प्रशासक प्रशांत राजाराम यांनी आभार मानले.
-------------------
अग्निवीर सैन्यभरतीबाबत
‘घाळी’मध्ये शुक्रवारी मार्गदर्शन
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालय व आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनतर्फे अग्निवीर सैन्य भरती मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी (ता. २) आयोजित केले आहे. डॉ. घाळी सभागृहात सकाळी साडेदहा वाजता हे शिबिर सुरू होईल. अग्निवीर योजनेंतर्गत सैन्य भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सैन्यदलातील विद्यमान अधिकारी येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी केले आहे.
---------------
स्वराज्य राऊतचा सत्कार
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील बारावीच्या विज्ञान वर्गातील विद्यार्थी स्वराज्य राऊत याने जेईई मेन या परीक्षेत कोणतीही शिकवणी न लावता यश मिळविल्याबद्दल प्राचार्य पी. टी. पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पाटील, ज्युनिअर विभागप्रमुख श्री. महाजन यांच्यासह विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91859 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..