रत्नागिरी ः गणपतीपुळे आज श्रींचे स्पर्शदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः गणपतीपुळे आज श्रींचे स्पर्शदर्शन
रत्नागिरी ः गणपतीपुळे आज श्रींचे स्पर्शदर्शन

रत्नागिरी ः गणपतीपुळे आज श्रींचे स्पर्शदर्शन

sakal_logo
By

rat30p32.jpg, rat30p33.jpg-
46614
रत्नागिरी ः भाद्रपदी गणेशोत्सव सुरू असून गणपतीपुळे मंदिरातील श्रींची मूर्ती सजवण्यात आली आहे.

गणपतीपुळेत आज श्रींचे स्पर्श दर्शन

दोन वर्षांनंतर योग; मंदिर पहाटे ४.३० पासून असणार खुले

रत्नागिरी, ता. ३० ः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे बुधवारी (ता. ३१) सर्व भक्तांना श्री गणेश चतुर्थीनिमित्त साध्या वेशात पहाटे ४.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत स्पर्शदर्शनाचा लाभ मिळणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे हा योग आलेला नव्हता.
प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रींच्या मंदिरात सर्व भक्तांना साध्या वेशात थेट गाभाऱ्‍यात स्पर्शदर्शन मिळते. वर्षातून हे दर्शन फक्त एकाच दिवशी मिळत असल्याने गणपतीपुळेसह परिसरातील ग्रामस्थ याचा लाभ घेतात. गेल्या दोन वर्षांत कोरोना कालावधीत मंदिर बंद असल्यामुळे स्पर्शदर्शन ग्रामस्थांना घेता आले नव्हते. आता निर्बंध उठवण्यात आल्याने स्पर्शदर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. बुधवारी स्वयंभू गणेशमंदिर पहाटे तीन वाजता उघडण्यात येणार आहे. श्रींची पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती होऊन सर्व भाविकांना स्पर्शदर्शनासाठी मंदिर पहाटे ४.३० वाजता खुले केले जाईल.
गणपतीपुळेत ‘एक गाव-एक गणपती’ची प्रथा पारंपरिकरीत्या यंदाही जोपासणार असून, केवळ गौरीउत्सव मोठ्या धूमधडाक्यात घरोघरी साजरा होणार आहे. विशेष म्हणजे गणपतीपुळे मंदिरातील ‘गणपती’ हाच आपला घरचा गणपती असल्याची सुमारे पाचशे वर्षांपूर्वीची प्रथा असल्याने गणपती मंदिरात सर्व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने उत्सवात सहभागी होतात, तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी होणाऱ्या स्पर्शदर्शनासाठीही स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने येत असतात. यामुळे स्थानिकांसह विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांनाही ठराविक दिलेल्या वेळेत दर्शन घेण्याची सोय अतिशय सुलभतेने होण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती प्रयत्नशील राहणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91886 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..