वाहूतूक मार्गात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहूतूक मार्गात बदल
वाहूतूक मार्गात बदल

वाहूतूक मार्गात बदल

sakal_logo
By

गणेश आगमनानिमित्त
वाहतूक मार्गात बदल

कोल्हापूर, ता. ३० ः घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्ती आणण्यासाठी कुंभार गल्लीत होणाऱ्या गर्दीचा विचार करून वाहतूक मार्गात बदल केला आहे. शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी, गंगावेस, बापट कँप आदी ठिकाणी हे बदल केल्याचे पत्रक शहर वाहतूक नियंत्रण शाखेने प्रसिद्धीस दिले आहे.

प्रवेश बंद केलेले मार्ग...
*शाहूपुरी कुंभार गल्लीत येणाऱ्या सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद आहे. यात अत्यावश्यक वाहने व मूर्ती नेण्यासाठी येणारी वाहने वगळली आहेत.
*फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज चौक दिशेने कुंभार गल्लीत येणारी वाहने
*पार्वती सिग्नल चौक, उमा टॉकीज चौक दिशेने कुंभार गल्लीत येणारी वाहने
*गवत मंडई चौकातून कुंभार गल्लीकडे येणाऱ्या वाहनांना मंडई चौकापासून प्रवेश बंदी आहे.

- पापाची तिकटी, गंगावेस (कुंभार गल्ली)-
*पापाची तिकटी ते बुरुड गल्ली जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.
*शाहू उद्यान, गंगावेस ते कुंभार गल्ली जाणाऱ्या वाहनांना उद्यानापासून पुढे सोडण्यात येणार नाही.
*गंगावेस चौक, पापाची तिकटी, माळकर चौक या मार्गावर वाहने पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

बापट कँप कुंभार गल्ली -
शिरोली टोल नाका ते बापट कँपकडे जाणारी सर्व वाहने शिरोली टोल नाका येथून पुढे सोडण्यात येणार नाही.
------
पार्किंग सुविधा...
आयर्विन ख्रिचन हायस्कूल मैदान
शाहूपुरी चौथी व पाचवी गल्ली वाहतुकीस अडथळा न करता
जाधववाडी शाळा क्रमांक ३२
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91908 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..