जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

sakal_logo
By

४६६३८

दानोळीतील तरुणाचा
आत्मदहनाचा प्रयत्न
जयसिंगपूर पालिकेत अनुकंपा नोकरीचा प्रश्‍न
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये अनुकंपाखाली मेहुण्याल नोकरीस घेत नसल्याच्या कारणावरून आज दुपारी एकच्या सुमारास संतोष राजू कांबळे (दानोळी, ता. शिरोळ) याने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच मंत्री, जिल्हाधिकारी उपस्थित असताना आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेथील कर्मचारी राजू भालचिम आणि दिलीप वडर यांनी संतोषच्या हातातील रॉकेलची बाटली काढून घेतल्यामुळे हा अनर्थ टळला.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आज कागलमधील झोपडपट्टीवासीयांचा विषय घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. बैठक संपताच ते बाहेर आले. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार परिसरात उपस्थित होते. यावेळी कांबळेने रॉकेलची बाटली अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. गोंगाट होताच कर्मचारी आणि पोलिसांनी रॉकेलची बाटली काढून घेवून त्याला ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक गजानन परीट यांनी तातडीने संतोषला पकडून तेथून बाहेर आणले. दरम्यान शाहूपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे, अशी माहिती श्री.परीट यांनी दिली.
दरम्यान २००७ पासून मेहुणा परशुराम कांबळे यांना अनुकंपाखाली नोकरी न दिल्याने तसेच अधिकारी भेटत नसल्याने हे कृत्य केल्याचे परशुराम कांबळे आणि संतोष कांबळे यांनी पोलिसांना सांगतिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91911 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..