साहस निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहस निवेदन
साहस निवेदन

साहस निवेदन

sakal_logo
By

46653

‘साहस’ला दोन एकर जागा द्या
...............
डॉ. नसीमा हुरजूक ः मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

कोल्हापूर, ता. ३० ः महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत त्यांच्या पुनर्वसनाचे काम अपुरे आहे. याचा विचार करून दिव्यांगांच्या पुनर्वसन कार्यासाठी साहस डिसॅबलिटी रीसर्च अँड केअर फौंडेशनला दोन एकर शासकीय जमीन नाममात्र दराने उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन संस्थेच्या संस्थापक डॉ. नसीमा हुरजूक यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.
दरम्यान, संस्थेच्या पुनर्वसन केंद्रासाठी शहरातील महापालिकेची एखादी शाळा किंवा इमारतही नाममात्र भाड्याने मिळावी, अशीही मागणी डॉ. हुरजूक यांनी दिलेल्या निवेदनात केली. ग्रामीण भागात राहणारे ७० टक्के दिव्यांग हे आजही उपचार, शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण व रोजगाराच्या अभावामुळे हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. म्हणून त्यांचे जगणे सुसह्य करण्याच्या हेतूने साहस संस्थेची स्थापना ३ डिसेंबर २०२० रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून केली. अपंगांना रोजगार उपलब्ध करून देणे, शासनाच्या योजनेतून दिव्यांगांसाठी वसतिगृह उभारणे, ग्रामीण भागातील परकोटीचे अपंगत्व असलेल्यांना उपचार, शिक्षण, प्रशिक्षण व नोकरीची संधी मिळावी, यासाठी ‘साहस’ प्रयत्नशील आहे. ‘साहस’च्या स्थापनेपासून आजअखेर ५२६ दिव्यांगांची नोंदणी झाली आहे. त्यातील १२५ व्हीलचेअर व २५ गंभीर बेडसोअर झालेल्या दिव्यांगांच्या उपचार व शस्त्रक्रियेचे कार्य संस्थेमार्फत सुरू आहे. या अपंगांसाठी शहरात सर्वसोयीनीयुक्त असे वसतिगृह बांधण्यासाठी किमान दोन एकर जागा मिळावी.
...............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91915 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..