आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीत जिल्‍ह्याची आघाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीत जिल्‍ह्याची आघाडी
आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीत जिल्‍ह्याची आघाडी

आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीत जिल्‍ह्याची आघाडी

sakal_logo
By

४६६७९

भुदरगडची सायली सारंग राज्यात प्रथम
शिष्यवृत्ती परीक्षा; आर्थिक दुर्बल शिष्यवृत्तीत जिल्‍ह्याची आघाडी
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ३० : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (एनएमएमएस) २०२१ -२२ मध्ये भुदरगड तालुक्यातील गारगोटी हायस्कूलच्या सायली विक्रम सारंग या विद्यार्थिनीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिला १७३ पैकी १६७ गुण मिळाले. जिल्‍ह्यातील १ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. यशस्‍वी विद्यार्थ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी अभिनंदन केले.
राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत १९ जून २०२२ रोजी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेण्यात आली होती. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी २९ ऑगस्टला जाहीर करण्यात आली. या परीक्षेस कोल्हापूर जिल्ह्यातून इयत्ता आठवीतील १६ हजार ११४ विद्यार्थी प्रविष्ट होते. यापैकी १ हजार ७५५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. निवड यादी व गुणवत्ता यादी राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेत १ हजार ७५५ विद्यार्थी निवडले गेले असून वर्गनिहाय विद्यार्थी संख्या अशी, सर्वसाधारण संवर्गातील ४५४, एस. सी. संवर्गातील १९१, एस. टी. संवर्गातील ७, व्हीजेए संवर्गातील ५३, एनटी बी संवर्गातील ४९, एनटीसी प्रवर्गातील ६६, एनटी डी प्रवर्गातील आठ, ओबीसी ३७२, एसबीसी ७४, इडब्‍ल्यूएस संवर्गातील ४८१ विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसाठी वर्षभर नियोजनबद्ध मार्गदर्शन करणारे शिक्षक, यशस्वी विद्यार्थी, मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनी अतिरिक्त मार्गदर्शन व मेहनत केल्यामुळेच घवघवीत यश मिळाले, असे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91921 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..