ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी
ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी

ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी

sakal_logo
By

साऊंड सिस्टीम मध्यरात्री बारापर्यंत
जिल्हाधिकारी राहुल रेखावार; ध्वनी मर्यादेचे बंधन; पूर्वपरवानगी आवश्‍यक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : गणेश चतुर्थी उद्या (ता. ३१) दिवशी सकाळी ६ ते मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक (साऊंड सिस्टीम) वापरण्यास परवानगी दिली आहे. गणेशोत्सव मंडळांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनानुसार याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, साऊंड सिस्टीम वापरण्याबाबत १४ सुटीचे दिवस यापूर्वी घोषित केले आहेत. उर्वरित एक दिवस आवश्यकतेनुसार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवला आहे. यानुसार ही सूट दिली आहे. २०२२ मध्ये ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० च्या नियम ५ (३) नुसार याचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागेव्यतिरिक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ वाजल्यापासून मध्यरात्री १२ पर्यंत जिल्ह्यामध्ये करता येईल. कोणत्याही ध्वनी प्रतिबंधित क्षेत्राच्या परिसरामध्ये आदेशानुसार कोणतीही सूट राहणार नाही. ध्वनिक्षेपक लावण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक राहील. जिल्ह्यासाठी ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्याबाबत घोषित केलेल्या १४ सुटीच्या दिवसात कोणताही बदल केलेला नाही, असे या आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91951 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..