हरतालिका व्रत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरतालिका व्रत
हरतालिका व्रत

हरतालिका व्रत

sakal_logo
By

46670

‘जय देवी हरतालिके...
घरोघरी पारंपरिक उत्साहात हरतालिका व्रत
कोल्हापूर, ता. ३० ः गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज घरोघरी हरतालिका व्रत पारंपरिक उत्साहात झाले. कुमारिका व महिलांनी हरितालिका पूजन केले. यानिमित्ताने उपवासाची परंपराही जपली गेली. मनासारखा पती मिळावा आणि पतीला दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. दरम्यान, ‘जय देवी हरतालिके, सखी पार्वती अंबिके...’ अशा आरतीचे सूर आज सर्वत्र उमटले. दोन वर्षे कोरोनामुळे महिलांना हे व्रत प्रतीकात्मक पद्धतीने घरीच करावे लागले होते; मात्र यंदा यानिमित्ताने महिलांच्या आनंदाला उधाण आले. व्रताच्या निमित्ताने केलेल्या पूजेची छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावरही झळकली. सामूहिक हरतालिका पूजनाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या जागरावरही भर दिला.

असाही जागर
पावसाळ्यात उगवणाऱ्या देशी वनस्पती, फुलांचा उत्सवात मोठ्या प्रमाणावर वापर होतो. किंबहुना निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच ही परंपरा सुरू झाली आहे. मात्र, अलीकडच्या काळात या पूजापत्रीमध्येही भेसळ होऊ लागली आहे. काही दुर्मीळ आणि औषधी वनस्पती तोडण्याचाही अतिरेक होऊ लागला आहे. त्याशिवाय काही विदेशी वनस्पतींचाही पत्री म्हणून विकल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवरही आता विविध पर्यावरण संस्थांतर्फे जागर केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91958 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..