पर्युषण पर्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्युषण पर्व
पर्युषण पर्व

पर्युषण पर्व

sakal_logo
By

फोटो- ४६६८३

पवित्र पर्यूषण पर्वानिमित्त
विविध धार्मिक कार्यक्रम
आठ दिवसांच्या पर्वाची आज सांगता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः जैन बांधवांच्या पवित्र पर्यूषण पर्वानिमित्त शहरातील विविध जैन मंदिरांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले. सलग आठ दिवसांच्या या पर्वाची सांगता उद्या (बुधवारी) होणार आहे.
गुजरीतील श्री संभवनाथ जैन श्वेतांबर ट्रस्ट मंदिरात आचार्य विमलबोधी सुरीश्वरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. श्री संभवनाथ मंदिर संघ (गुजरी), श्री मुनिसुव्रत मंदिर संघ (लक्ष्मीपुरी), श्री वासुपूज्य मंदिर संघ (महावीर नगर), श्री आशापुरण मंदिर संघ (भक्तिपूजानगर), श्री शत्रुंजय सोसायटी संघ, श्री शांतीनाथ मंदिर (शाहूपुरी) यांसह शहरातील विविध जैन मंदिरांत धार्मिक कार्यक्रम झाले.
विविध जैन मंदिरांतील पाळणा या निमित्ताने भक्तांच्या घरी आणण्याची परंपरा आहे. या निमित्ताने समाजबांधव या ठिकाणी एकवटतात आणि धार्मिक आनंदोत्सव साजरा करतात. दरम्यान, या काळात वर्षभर विविध कारणांनी दुखावलेल्या सर्वांची ‘मिच्छामि दुक्कडम’ म्हणून क्षमा मागितली जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91964 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..