सोनोग्राफी सेंटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनोग्राफी सेंटर
सोनोग्राफी सेंटर

सोनोग्राफी सेंटर

sakal_logo
By

...तर सोनोग्राफी सेंटरवर कडक कारवाई
चव्‍हाण यांचा इशारा; मुला-मुलींचे व्यस्त प्रमाण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ३० : जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबत संबंधित सर्व विभागांना सूचनाही दिल्या आहेत. गर्भवतीची अनधिकृपणे किंवा बेकायदेशीर सोनोग्राफी होत असल्याचे आढळल्यास संबंधित सेंटरवर सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी दिला. जिल्हास्तरीय पीसीएनडीटीच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई उपस्थित होते.
सोनोग्राफी मशिनमध्ये नवीन सुधारणा झालेली असून, सायलेंट ऑब्झर्व्हरसाठी खर्चाची बाब असल्याने रुग्णावर आर्थिक बोजा होऊ शकतो, असे मत रेडिऑलॉजिस्ट संघटनेच्या अध्यक्ष डॉ. स्वेनील शहा यांनी व्यक्त केले. लवकरात लवकर गर्भवतीची नोंदणी ही अपेक्षित असून, आशा, अंगणवाडी सेविकांना याबाबत योग्य त्या सूचना देऊन गरोदरपणीच मातेचे सनियंत्रण करावे, अशी सूचना अॅड. पाटील यांनी मांडली.
जिल्ह्यातील ९५ टक्के सोनोग्राफी सेंटरच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत; मात्र अनोंदणीकृत मशिनद्वारे गर्भवतीची तपासणी होत असल्यास त्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी सूचना स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्ष डॉ. गीता पिल्लाई यांनी व्यक्त केली. तसेच या अनधिकृत केंद्राकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्‍त केली. यावर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत चालू महिन्यात सर्व ठिकाणी छाप्यांचे नियोजन करून सर्व ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत असून, त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी स्‍पष्‍ट केले.

कोट
नावीन्यपूर्ण योजना राबविण्यापूर्वी तसा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्तावित करणे आवश्यक आहे, असे असले तरी सोनोग्राफी मशिनला सायलेंट ऑब्जर्व्हर बसविण्यासाठी तज्ज्ञ समितीशी चर्चा केली जाईल. कारण अनधिकृत सोनोग्राफी करून घेताना नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे व जिल्ह्यासाठी मुला-मुलींचे व्यस्त प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न केले जातील.
संजयसिंह चव्‍हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासक होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91965 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..