व्यंक्काप्पा भोसले पुस्तक प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यंक्काप्पा भोसले पुस्तक प्रकाशन
व्यंक्काप्पा भोसले पुस्तक प्रकाशन

व्यंक्काप्पा भोसले पुस्तक प्रकाशन

sakal_logo
By

४६६९७

भोसले यांचे पुस्तक जगण्याची स्फूर्ती देणारे
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज; ‘राजर्षी शाहू महाराज आणि भटके विमुक्त’ पुस्तकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः ‘‘भटके विमुक्त राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाले असले तरी सामाजिकदृष्ट्या पूर्ण स्वतंत्र झालेत, अशी स्थिती आज दिसत नाही. शिक्षणाने समाजात समानता येऊ शकते. अजूनही जे घटक शिक्षणापासून दूर आहेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे. अशा घटकांना व्यंकाप्पा भोसले यांनी लिहिलेले पुस्तक सन्मानाने जगण्याची वाट दाखवण्याची स्फू‍र्ती देणारे आहे’’, असे मत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे व्यक्त केले. राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांनी लिहिलेल्या ‘राजर्षी शाहू महाराज आणि भटके विमुक्त’ या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.
व्यंकाप्पा भोसले म्हणाले, ‘‘ब्रिटिशांच्या काळात भटक्या विमुक्तांना गुन्हेगार समाज म्हणून बंदिस्त करून ठेवले होते. काही दोष नसतानाही ब्रिटिश जुलूम करीत होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३१ ऑगस्टला १९५३ ला भटक्यांना बंदिस्तपणातून मुक्त केले. हा दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा होतो.’’
ते म्हणाले, ‘‘कर्नाटकातील तत्कालीन जंगलात राहणाऱ्या भटक्या लोकांना धाडशी व वन्यजीवांच्या हालचालींची समज होती. अशा भटक्यांना राजर्षी शाहू महाराजांनी शिकारखान्यात काम दिले. त्याच भटक्या समाजातील तिसरी पिढी येथे आहे. शाहू महाराजांविषयी कृतज्ञतेचा भाग म्हणून पुस्तक वाचकांसमोर आणले आहे.’’
डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘शाहू महाराजांविषयी प्रेमळ भावना, तसेच कृतज्ञता व्यक्त करणारे पुस्तक आहे. श्री. भोसले यांच्या तीन पिढ्यांना शाहू महाराजांच्या विचारांचा परिसस्पर्श लाभला. त्याचे संदर्भ पुस्तकात आहेत. शाहू महाराजांच्या कार्याची आठवण करून देणारी अनेक स्‍थळे कोल्हापुरात आहेत. त्याची माहिती जरी मुलांना सांगितली, तरी शाहू महाराज नव्या पिढीला समजून घेता येतील.’’
सुनील भोसले, प्रा. अरुण शिंदे, प्राचार्य टी. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.


पैलू समजून घ्या
डॉ. रमेश जाधव म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराजांनी भटक्या विमुक्तांना संस्थानात आणून जातिभेद निर्मूलनाची शिकवण दिली. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाच्या छटा दर्शवणारे पुस्तक आहे. आज एका जातीने दुसऱ्या जातीला कमी लेखण्याचे प्रकार थांबले पाहिजेत, त्यासाठी शाहू महाराजांच्या कार्याचे पैलू समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी हे पुस्तक मदत करेल.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91979 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..