खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करा ः परीक्षा नियंत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करा ः परीक्षा नियंत्रक
खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करा ः परीक्षा नियंत्रक

खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करा ः परीक्षा नियंत्रक

sakal_logo
By

४६६९८

परीक्षेबाबत खोटी माहिती
पसरविणाऱ्यांवर कारवाई करा
---
शिवाजी विद्यापीठाची मागणी; पोलिस अधीक्षक बलकवडे यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांबाबत समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती तसेच अफवा पसरविणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कडक कारवाई करा, अशी मागणी परीक्षा मंडळाचे संचालक अजितसिंह जाधव यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिले. या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी या वेळी दिले.
शिवाजी विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेल्या परीक्षेच्या अनुषंगाने काही अज्ञात समाजकंटकांनी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरील परिपत्रकात फेरफार करून २३ ऑगस्टचा एम.एस्सी.चा फिजिकल केमिस्ट्रीचा पेपर रद्द केल्याचे समाजमाध्यमांद्वारे व्हायरल केले. तसेच, एका वृत्तपत्रातील बातमीही अशाच प्रकारे फेरफार करून समाजमाध्यमांतून व्हायरल केली. यामुळे परीक्षार्थींसह महाविद्यालये, प्राचार्य आदी घटकांत मोठा संभ्रम निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला ऐन परीक्षेच्या कालखंडात मोठी धावपळ करावी लागली. शिवाजी विद्यापीठासारख्या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या परीक्षाविषयक गंभीर, गोपनीय आणि अतिमहत्त्वाच्या कामाविषयी समाजात चुकीचा संदेश जाण्याबरोबरच विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि लेडरहेड यांचाही गैरवापर केल्याचे आढळून आले. सदर प्रकरणी पोलिस प्रशासनाने अद्ययावत सायबर सेलमार्फत चौकशी करून समाजातील या विकृत मनोवृत्तीला आळा घालण्याच्या उद्देशाने दोषी व्यक्तींना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन आज शिवाजी विद्यापीठातर्फे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बलकवडे यांना आज प्रत्यक्ष भेटून दिले. त्यांच्याबरोबर परीक्षा विभागाचे उपकुलसचिव निवास माने होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91983 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..