सर्कीट बेंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्कीट बेंच
सर्कीट बेंच

सर्कीट बेंच

sakal_logo
By

४६६६४

सर्किटबेंचप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील; खंडपीठ कृती समितीतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू तसेच मुख्य न्यायमूर्ती व मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता खंडपीठ कृती समितीने त्यांची शासकीय विश्रामगृहात घेतली. यावेळी समितीतर्फे त्यांचा सत्कार केला.
खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके म्हणाले, ‘‘सर्किट बेंच लढा अंतिम टप्यात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून मुख्य न्यायमूर्ती सोबत भेट घेण्याची विनंती करावी. मंत्री पाटील यांनी सहा जिल्ह्याचा सर्किट बेंच प्रश्न मला माहीत आहे. कोल्हापूर येथे सर्किट बेंच प्रश्न मार्गी लागण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष ॲड. विवेक घाटगे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव अडगुळे, जिल्हा बार असो उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, सचिव ॲड. विजयकुमार ताटे- देशमुख, ॲड. संदीप चौगुले, माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. विवेक शुक्ल, ॲड. शिवराम जोशी, ॲड. प्रशांत देसाई, ॲड. व्ही. आर. पाटील, ॲड. कोमलराव राणे, ॲड. तृप्ती नलवडे ॲड. सुशांत चेंडके, ॲड. महांतेश कोल्हे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91986 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..