दोन तलवारी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन तलवारी जप्त
दोन तलवारी जप्त

दोन तलवारी जप्त

sakal_logo
By

शिवाजी धनगर
02781

टॅक्सी चालकाची आत्महत्या
उजळाईवाडी ः येथील कोल्हापूर विमानतळावर टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या शिवाजी रामचंद्र धनगर (वय ३३, उजळाईवाडी ) यांनी राहत्या घरी काल (ता.३०) रोजी दुपारी तीन वाजता गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान शिवाजी यांना उपचारार्थ सीपीआर येथे दाखले केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या मागे पत्नी मुलगा आई-वडील भाऊ असा परिवार आहे.

वारे वसाहतीत चार तलवारी जप्‍त
कोल्हापूर ः वारे वसाहतीतून काल रात्री जुना राजवाडा पोलिसांनी चार तलवारी जप्‍त केल्‍या. याप्रकरणी खंडू माने आणि गणेश माने या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर भारतीय हत्‍यार कायद्यान्‍वये कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

एकास रॉडने मारहाण
कोल्हापूर ः दुकानाचा बोर्ड पाडल्याची विचारणा केल्यावरून रॉडने केलेल्या मारहाण प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला. धोंडिबा कानूरकर (रा. मंगळवार पेठ) असे त्या संशयिताचे नाव आहे. काल सायंकाळी मंगळवार पेठेत हा प्रकार घडला. याबाबतची फिर्याद जखमी प्रशांत शिंदे यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातातील जखमीचे निधन
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गावर सायकलस्वारला चुकवताना मोटरसायकलवरून पडून शुभम बाळू कमते (जवाहरनगर इचलकरंजी) हे जखमी झाले होते. त्यांच्यावर इचलकरंजी येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात शुक्रवारी (ता.२६) सायंकाळी झाला होता.
या अपघातप्रश्नी मयत कमते यांच्यावरच जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. याची फिर्याद राहूल नागणगौडा गौडर (वय ३०,इचलकरंजी) यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92018 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..