सायकल योजनेत दुर्गम भागातील मुलींना प्राधान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकल योजनेत दुर्गम भागातील मुलींना प्राधान्य
सायकल योजनेत दुर्गम भागातील मुलींना प्राधान्य

सायकल योजनेत दुर्गम भागातील मुलींना प्राधान्य

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

दुर्गम भागातील मुलींना
सायकल योजनेत प्राधान्य

चव्‍हाण; महिला बालकल्याण विभागाची बैठक

कोल्‍हापूर, ता. ३१ : जिल्‍हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून वैयक्ति‍क लाभाच्या योजना घेतल्या जातात. यावर्षीही सायकल वाटपाची योजना घेतली आहे. मात्र, ज्या ठिकाणी प्रवासासाठी साधने नाहीत, अशा दुर्गम भागात मुलींसाठी सायकल वाटपास प्राधान्य द्यावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्‍पा पाटील उपस्‍थित होत्या.

जिल्‍हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल देण्याची योजना आहे. त्यापद्धतीने महिला व बालकल्याण विभागाकडून मुलींना सायकल देण्याची योजना दरवर्षी घेतली जाते. मात्र, या सायकली गरजू मुलींपर्यंत पोहोचत नाहीत. या सायकलची खरी गरज चंदगड, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, पन्‍हाळा, शाहूवाडी तालुक्यातील विद्यार्थिनींना आहे. मात्र, या योजनेतील सर्वाधिक लाभार्थी हे करवीर, कागल, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातच पाहायला मिळतात. यावर्षी मात्र जिल्‍हा परिषदेत पदाधिकारी नसल्याने साहित्य वाटपात मनमानी चालणार नाही.
महिला बालकल्याण विभागाकडून सायकल योजनेप्रमाणेच महिलांसाठी आणखी एक नावीन्यपूर्ण योजना राबवण्याचे नियोजन आहे. दुधावर प्रक्रिया करून त्याचे उपपदार्थ तयार करणे व त्यातून आर्थिक स्‍थैर्य मिळवण्यासाठी या योजनेचे नियोजन केले आहे. आजपर्यंत या विभागाने शिलाई मशिन, पिको फॉल मशिन यावरही कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र, त्यातून कोणी उद्योग उभा करून आर्थिक स्‍थैर्य प्राप्‍त केले, अशी फारशी उदाहरणे नाहीत. त्यामुळे यावर्षी जुन्या योजनांना फाटा देऊन नावीन्यपूर्ण योजना घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92027 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..