गावागावत लागणार जल जीवनचे फलक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावागावत लागणार जल जीवनचे फलक
गावागावत लागणार जल जीवनचे फलक

गावागावत लागणार जल जीवनचे फलक

sakal_logo
By

गावागावांत आता
जलजीवनचे फलक

जल व्यवस्‍थापन समितीत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ३१ : जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणी योजना मंजूर झाल्या आहेत. मात्र, बहुतांश ग्रामस्‍थांना योजनांची माहितीच नाही. योजनेत पारदर्शकता यावी, लोकांनी या योजनेत सहभाग द्यावा, या योजनेतील कामावर त्यांनी लक्ष द्यावे, यासाठीच गावागावांत पाणी योजनांची माहिती देणार फलक लावावेत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी दिल्या. जलव्यवस्‍थापन समितीच्या बैठकीत योजनेतील लोकसहभागावर चर्चा झाली.
जलजीवन मिशन योजनेतून प्रति माणसी ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे. जिल्‍ह्यात ७०० पेक्षा अधिक योजनांना मंजुरी दिली आहे. मात्र, अनेक गावांमध्येत योजना मंजूर झाली असल्याची माहितीच नाही. गावात पाणी योजनेचे काम सुरू झाले असतानाही त्याची माहिती नाही. त्यामुळे लोकवर्गणी देणार कोण?, असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. फलक पाहून तरी लोकांना या योजनेची माहिती समजेल, लोक योजनेबाबत प्रश्‍‍न उपस्‍थित करतील, चुकीचे काम सुरू असेल तर जाब विचारतील, हा त्यामागचा उद्देश आहे. योजना सुरू असतानाच तक्रारी आल्या तर त्यावर कारवाई करणे सोपे होणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर तक्रारी आल्या, तर अनेक अडचणी येणार आहेत.
--
कोट
सध्या पाणी योजनांचे प्रकल्‍प अहवाल तयार करणे, त्यांना मंजुरी देणे, निविदा प्रक्रिया राबवून कामांचे आदेश दिले जात आहेत. या योजनेसाठी ग्रामसभेचे ठरावही घेतले जात आहेत. मात्र, बहुतांश लोकांना योजनेची माहिती असत नाही. लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी गावागावांत योजनेचे फलक लावले जाणार आहेत.
- अशोक धोंगे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92036 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..