गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त

sakal_logo
By

46773
गडहिंग्लज : खेळाडू ऋतिक वर्मा व अथर्व चिगरीचा सत्कार करताना सतीश घाळी, दयानंद गुरव. शेजारी विजयकुमार चौगुले, विलास शिंदे, सुनील देसाई व क्रीडा शिक्षक.

जागृतीच्या ऋतिक, अथर्वला सुवर्णपदक
गडहिंग्लज : येथील जागृती हायस्कूलचा धावपटू ऋतिक वर्मा याने नाशिकमध्ये झालेल्या महास्टेट ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप राज्यस्तरीय स्पर्धेत १६ वर्षे वयोगटात दोन हजार मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. अथर्व चिगरीने देरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत दोन हजार मीटर धावणेमध्ये १४ वर्षांखालील गटात सुवर्णपदक मिळविले. वर्मा याची हरियाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, दयानंद गुरव यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार केला. मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, मुत्नाळचे मुख्याध्यापक विलास शिंदे, प्रा. सुनील देसाई, क्रीडा शिक्षक संपत सावंत, बाळासाहेब खरात, पुंडलिक हरकारे उपस्थित होते.
---------------
जागृतीमध्ये सत्कार कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील जागृती हायस्कूलमध्ये कोजिमाशि संस्थेच्या येथील शाखेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्यासह सदस्य जयवंत दरेकर, संपत सावंत, संतोष देसाई, किरण आमणगी यांचा सत्कार केला. सदाशिव देसाई, रफिक पटेल, विनायक नाईक, संजय देसाई, बजरंग गरुड यांच्या हस्ते हा सत्कार झाला. या वेळी शिंदे यांनी सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन काटकसरीने कारभार करण्याचे आश्‍वासन दिले. पटेल यांनी स्वागत केले. शाखा सदस्य संपत देसाई यांचे भाषण झाले. सदाशिव देसाई यांनी अध्यक्षीय भाषण केले. सचिन रेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. किरण आमणगी यांनी आभार मानले. राजाराम माने, रणजित देसाई, रमेश भांडवलकर, प्रकाश गुरव आदी सभासद उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92054 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..