मनपा क्षेत्रातील मंडळांसाठी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा क्षेत्रातील मंडळांसाठी स्पर्धा
मनपा क्षेत्रातील मंडळांसाठी स्पर्धा

मनपा क्षेत्रातील मंडळांसाठी स्पर्धा

sakal_logo
By

शहरातील पर्यावरणपूरक मंडळांसाठी पुरस्कार
-
महापालिकेतर्फे आयोजन; तीन विजेते निवडणार

कोल्हापूर, ता. ३१ : शासनाने राबवलेल्या उपक्रमाच्या धर्तीवर शहरातील मंडळांसाठी गणेशोत्सव मंडळ स्पर्धा घेण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मंडळांनी शासन स्तरावर व महापालिका या दोन्ही ठिकाणी नोंदणी करून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
शासन निर्णयाप्रमाणे स्पर्धेचे स्वरूप, निकष ठरविले आहेत. स्थानिक पोलिस स्टेशन आणि महापालिकेची परवानगी घेतलेल्या मंडळांना सहभाग घेता येईल. सहभाग विनाशुल्क असेल. अर्जाचा नमुना www.kolhapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर आहे. तो भरून healthswm१@gmail.com या ई-मेलवर शनिवारपर्यंत (३ सप्टेंबर) ऑनलाईन पाठवावा अथवा महापालिका मुख्य इमारतीमधील मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालयात जमा करावा. स्पर्धेमधून ३ स्पर्धकांची विजेते म्हणून निवड होईल. मूल्यांकनासाठी निवड समिती गठित करण्यात येईल. प्रशस्तीपत्र व ट्रॉफी असे बक्षिसाचे स्वरूप आहे. निकालाची तारीख व बक्षीस वितरण समारंभाची तारीख, ठिकाण कळविण्यात येईल.
पर्यावरणपूरक मूर्तीसाठी १० गुण, पर्यावरणपूरक सजावट (थर्माकोल-प्लास्टिक आदी विरहीत) १५ गुण, ध्वनिप्रदूषणरहित वातावरण ५ गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्ध निर्मूलन, सामाजिक सलोखा आदी समाज प्रबोधन विषयावर देखावा-सजावटीसाठी २० गुण, स्वातंत्र्याचा चळवळी संदर्भातील देखावा-सजावट २५ गुण, रक्तदान शिबिर, वैद्यकीय सेवा शिबिर आदीसाठी १० गुण, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदींबाबत १० गुण, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक-आरोग्य-सामाजिक आदीसाठी १० गुण, पारंपरिक-देशी खेळाच्या स्पर्धेसाठी १० गुण, गणेश भक्तांसाठी पाणी, प्रसाधानगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे नियोजन, आयोजनातील शिस्तीसाठी २५ गुण अशा १० स्पर्धेसाठी १५० गुण असणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92088 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..