शालेय स्पर्धा रेंगाळल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय स्पर्धा रेंगाळल्या
शालेय स्पर्धा रेंगाळल्या

शालेय स्पर्धा रेंगाळल्या

sakal_logo
By

आधी कोरोनाचा आता वादाचा फटका
शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा; सलग तिसऱ्यावर्षी ब्रेक
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : गेली दोन वर्षे कोरोनाच्या निबंर्धांमुळे शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. यंदा शालेय खेल महासंघातील वादामुळे या स्पर्धा अनिश्‍चिततेच्या गर्तेत सापडल्या आहेत. परिणामी, सलग तिसऱ्यावर्षी खेळाडू घडण्याच्या प्रक्रियेचा ब्रेक कायम आहे. स्पर्धाच नाही, तर सराव तरी कशाला करायचा असा खेळाडूंचा सवाल आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूवर स्पर्धा अभावी मोठा परिणाम होतो आहे.
दरवर्षी जुलै महिन्यात शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांचा नारळ फुटतो. चौदा, सोळा आणि एकोणीस वर्षाखालील गटात सुमारे दोन डझनाहून अधिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होतात. गेली दोन वर्षे कोरोनाच्या निबंर्धांमुळे स्पर्धाच झाल्या नाहीत. यंदा निर्बंध हटल्याने स्पर्धा होतील अशीच सर्वांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात याबाबत कोणत्याच हालचाली नाहीत. त्यामुळे सराव करणाऱ्या खेळाडूंचा धीर खचत आहे.
या स्पर्धांतील राज्य, राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्रे नोकरीसाठी ग्राह्य धरली जातात. तसेच खेळाडूंना ग्रेस गुण देखील मिळतात. पण, स्पर्धांच नसल्याने ही प्रक्रियाच ठप्प आहे. खासकरून ऑनलाईन शिक्षणामुळे शालेय विद्यार्थी मोबाईलला जणू चिकटून गेली आहेत. क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने हे विद्यार्थी मैदानावर पुन्हा परततील अशीच शिक्षक आणि पालकांची आशा होती. पण, शासकीय क्रीडा स्पर्धांचा मुहूर्त लांबत चालल्याने नवोदित खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होतो आहे.

चौकट..
राज्यस्तरीयची मागणी
भारतीय खेल महासंघातील वादामुळे या स्पर्धा रेंगाळल्याचे सांगितले जात आहे. पण, महाराष्ट्रातील खेळाडूंचा विचार करता किमान तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याची मागणी खेळाडूंची आहे. राज्याच्या क्रीडा विभागाने यासाठी तातडीने पावले उचलून खेळाडूंना न्याय द्यावा, अशी पालकांची अपेक्षा आहे.

कोट..
शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांत खेळाची आवड शासकीय स्पर्धामुळे होत असते. तसेच, याचवेळी खेळाडूंच्या जडणघडणीचा श्रीगणेशा होतो. त्यामुळेच शासनाच्या क्रीडा विभागाने तातडीने स्पर्धा घ्याव्यात.
- सपंत सावंत, क्रीडाशिक्षक, गडहिंग्लज

दोन वर्षे स्पर्धा नसल्याने कुचबंना झाली. यंदाही ऑगस्ट महिना संपला तरी स्पर्धेच्या हालचाली नाहीत. यामुळे सरावातील इंटेरेस्ट कमी होत चालला आहे.
- सौरभ शिंदे, श्रेयस कोरी, शालेय फुटबॉलपटू, गडहिंग्लज

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92109 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..