आजऱ्यात जल्लोषात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात जल्लोषात स्वागत
आजऱ्यात जल्लोषात स्वागत

आजऱ्यात जल्लोषात स्वागत

sakal_logo
By

46827
आजरा : येथील बाजारपेठतून मिरवणुकीने निघालेले घरगुती गणपती.

आजऱ्यात जल्लोषात स्वागत
आजरा, ता. ३१ : यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने गणेश भक्तांनी बाप्पाचे उत्साहात व जल्लोषात स्वागत केले. पारंपरिक वाद्याच्या निनादात मिरवणूक निघाल्या. गणपती बाप्पा मोरया...च्या घोषणेने परिसर दुमदूमून गेला होता. सकाळच्या पहिल्या टप्प्यात घरगुती गणपतीचे आगमन झाले. दुपारनंतर गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींची मिरवणुकीने प्रतिष्ठापना झाली. दिवसभर सर्वत्र चैतन्याचे व आनंदाचे वातावरण होते.
पहाटेपासून कुंभारवाड्यात गजबज दिसून आली. कुंभारवाड्यातून घरोघरी पारंपरिक वाद्याच्या निनादात मिरवणुका निघाल्या. प्रत्येक घरात विविध आकाराचे मकर तयार करण्यात आले होते. यंदा सजावटीसाठी विविध प्रकाराचे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाल्याने घरोघरी सुंदर व आकर्षक सजावट करण्यात आली. दुपारपर्यंत घरोघरच्या गणरायांची प्रतिष्ठापना झाली. दुपारनंतर गणेशोत्सव तरुण मंडळाच्या गणपतीचे आगमन सुरू झाले. सायंकाळनंतर अनेक गावात गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना झाली. आजऱ्यासह उत्तूर, भादवण, पेरणोली, वाटंगी, कोळींद्रे, बहिरेवाडी, गवसे, आरदाळ, मडिलगे, मलिग्रे, गजरगाव, कोवाडे, महागोंड, सिरसंगी, किणे यासह विविध गावात गणपती बाप्पाचे उत्साही स्वागत झाले.
--------------
चौकट
पावसातही उत्साह
गेले आठ दिवस पावसाने उघडीप दिली होती. आज मात्र पावसाने अनेकदा हजेरी लावली. पावसात देखील गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुका निघाल्या. पावसात भिजत युवक व आबाल वृद्धांनी गणरायांच्या स्वागताचा आनंद द्विगुणीत केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92117 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..