पाटील सहकार समुहातील संस्थांची मुगळीत संयुक्त सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटील सहकार समुहातील
संस्थांची मुगळीत संयुक्त सभा
पाटील सहकार समुहातील संस्थांची मुगळीत संयुक्त सभा

पाटील सहकार समुहातील संस्थांची मुगळीत संयुक्त सभा

sakal_logo
By

46839
मुगळी : पाटील सहकार समूहातील संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार करताना मलाप्पा चौगुले. शेजारी बी. जी. स्वामी व इतर.

पाटील सहकार समूहातील
संस्थांची मुगळीत संयुक्त सभा
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. ४ : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील बी. एन. पाटील सहकार समूहातील श्री लक्ष्मी ग्रामीण पतसंस्था, श्री अवधूत विकास सेवा संस्था व हनुमान दूध संस्था या तीन संस्थांच्या संयुक्त वार्षिक सभा उत्साहात झाल्या. के. एन. पाटील अध्यक्षस्थानी होते.
श्री लक्ष्मी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सभा झाली. सचिव वसंत मुसळे यांनी अहवालवाचन केले. अहवाल सालात संस्थेला १८ लाख ५ हजार २२४ रुपयांचा नफा झाला असून, सभासदांना १५ टक्के लाभांश वाटपाचा निर्णय झाला. संस्थेचे खेळते भांडवल १९ कोटी ८० लाख असून, १६ कोटी ८७ लाखांच्या ठेवी आहेत. सात कोटी ४१ लाखांची कर्जे वाटप केली आहेत, तर १२ कोटी ५ लाख रुपयांची गुंतवणूक आहे.
श्री अवधूत सेवा संस्थेचे अहवालवाचन सचिव गुरुगोंडा पाटील यांनी केले. संस्थेला सात लाख २९ हजारांचा नफा झाला असून, नऊ टक्के लाभांश वाटपाचा निर्णय झाला. अहवाल सालात वसूलपात्र कर्जाची शंभर टक्के वसुली करून परंपरा अखंडित ठेवली आहे.
हनुमान दूध संस्थेची ५० वी वार्षिक सभा झाली. सचिव रायाप्पा धुळाज यांनी अहवालवाचन केले. यावेळी मोबाईलवर ई पीक पाणी नोंदणीबाबत मंडल अधिकारी गाडीवडर यांनी माहिती दिली. दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासह न्यू इंग्लिश स्कूलच्या गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. बी. जी. स्वामी यांचे भाषण झाले. सभेस पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, सोसायटीचे अध्यक्ष मल्लाप्पा चौगुले, दूधसंस्थेचे अध्यक्ष सोमगोंडा पाटील, सुरेश धनवडे, शंकर माने, तानाजी विचारे, अण्णाप्पा धनवडे, सुधाकर शिंदे, गुरुनाथ बंडगर, ज्योती माने, सुबराव जगदाळे, लालासाहेब शिंदे, नितीन पाटील, सचिन पाटील, पुंडलिक आरबोळे यांच्यासह सभासद उपस्थित होते. रायगोंडा पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92126 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..