बावडा गणेशोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावडा गणेशोत्सव
बावडा गणेशोत्सव

बावडा गणेशोत्सव

sakal_logo
By

बावड्यात जल्लोषी स्वागत
कसबा बावडा, ता. ३१ ः ढोल, ताशांसह पारंपारिक वाद्यांचा गजर, चिरमुरे, फुलांची उधळण आणि मोरय्याच्या अखंड गजरात येथे घरगुती गणरायाचे स्वागत झाले. सायंकाळनंतर सिस्टीमच्या दणदणाटात मंडळाच्या मूर्तींचे आगमन मुख्य रस्त्यावरून झाले. मंडळांनी केलेल्या विद्युत रोषणाईने मुख्य मार्गही उजळून निघाला. रात्री उशीरापर्यंत आगमन मिरवणुका सुरू होत्या.
पारंपारिक पोषाख, नऊवारीत नटलेल्या सुवासिनी, डोक्यावर फेटा, टोपी घालून मूर्ती आणि गणपत्ती बाप्पा मोरयाचा गजर करणारे बालचमू असे वातावरण आज मुख्य रस्त्यावर पहायला मिळाले. अनेकांनी वाद्यांच्या गजरात आपल्या गणरायाचे स्वागत केले. मुख्य रस्ता, पिंजार गल्ली याठिकाणी मूर्ती नेण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. मुख्य मार्गावर गपपतीच्या सजावटीसह पुजेसाठी लागणाऱ्या साहित्यांचे स्टॉल उभारले होते. सायंकाळनंतर मंडळाच्या आगमन मिरवणुका मोठ्या जल्लोषात निघाल्या. आवाजाची मर्यादा राखून रात्री १२ पर्यंत लाऊड स्पिकर लावण्यास परवानगी दिल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92151 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..