गळीताचा ‘घट’ यंदा तरी बसेल का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गळीताचा ‘घट’ यंदा तरी बसेल का?
गळीताचा ‘घट’ यंदा तरी बसेल का?

गळीताचा ‘घट’ यंदा तरी बसेल का?

sakal_logo
By

46867

गळिताचा ‘घट’ यंदा तरी बसेल का?
गोडसाखरचा हंगाम; कारखाना चालवण्यास देण्याचा प्रस्ताव लाल फितीतच
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : सहकार विभागाने यंदा ऑक्टोबरमध्येच राज्यातील ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. परंतु, दरवर्षी सर्रास घटनास्थापनेला बहुतांश कारखान्यांचे चिमणी पेटते. आर्थिक चक्रव्युहात सापडलेल्या आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा ‘घट’ यंदा तरी वेळेत बसणार का? असा प्रश्‍न सभासदांसह ऊस उत्पादक, कामगारांना पडला आहे.
ब्रिस्क कंपनीने सोडचिठ्ठी दिल्यानंतर गतवर्षी एप्रिलमध्ये हा कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात आला. त्यानंतर कारखाना हंगामाच्या हालचाली सुरू झाल्या. उणे नेटवर्थमुळे कारखान्याला अर्थसहाय्य देण्यास कोणीही पुढे आले नाही. यामुळे वेळेत हंगाम सुरू झाला नाही. अखेर डिसेंबरमध्ये तत्कालीन सत्तारुढांनी स्वबळावर हंगाम सुरू केला. मात्र राजकीय कुरघोडीने तो ही अल्पकाळाचाच ठरला. दरम्यान, अंतर्गत राजकारण टोकाला गेल्याने सत्तारुढांत फूट पडली अन् बारा संचालकांनी राजीनामा दिला. अल्पमतातील संचालकामुळे कारखान्याचा कारभार प्रशासक मंडळाकडे आहे.
यंदाचा हंगाम वेळेत सुरु व्हावा यासाठी प्रशासकांनी विशेष वार्षिक सर्वसाधारण घेतली. त्यात कारखाना चालवण्यास देण्याचा ठराव झाला. या ठरावासह बारा वर्षासाठी कारखाना चालवण्यास देण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करुन प्रशासकांनी मंजूरीसाठी शासनाला पाठविला आहे. दरम्यान, राज्यात सत्ता बदल झाला अन् महिनाभर मंत्रीमंडळ अस्तित्वात नव्हते. यामुळे हा प्रस्ताव मंत्रालयात सहकार विभागाच्या लाल फितीतच आहे. आता मंत्रीमंडळ अस्तित्वात आले आहे. सहकार मंत्री अतूल सावे या मंत्रीसमितीचे अध्यक्ष आहेत. परंतु, त्यातील तीन सदस्य हे सहकार, पणन व अर्थ राज्यमंत्री असतात. मात्र अजूनही राज्यमंत्री नसल्याने पुन्हा हा प्रस्ताव समितीच्या वेटींगवरच आहे.
----------------
चौकट...
प्रशासकांची सहकार मंत्र्यांशी चर्चा
दरम्यान, कारखाना चालविण्यास देण्याच्या मंत्री समितीसमोरील प्रस्तावासंदर्भात प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अरुण काकडे यांनी सहकार मंत्री अतूल सावे यांच्याशी चर्चा केली आहे. मंत्री सावे याबाबत सकारात्मक असून संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे आश्‍वासित केल्याचे काकडे यांनी सांगितले.
---------------
निवडणुकीसह हंगामही अधांतरी
कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. तितक्यात सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली. दुसरीकडे मंत्री समितीसमोरील प्रस्तावावर अद्याप निर्णय नाही. आता सप्टेंबर महिन्यातच गोडसाखरेचा निर्णय आवश्यक आहे. कारण, नादुरुस्त मशिनरीची दुरुस्ती हंगामापूर्वी करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. सप्टेंबरनंतर निवडणूक केव्हा होणार याचीही शाश्‍वती कोणाला नाही. सध्या हंगामबाबतही ठोस हालचाली नसल्याने यंदा घटस्थापनेला गोडसाखरची चिमणी पेटणार का, याच प्रतिक्षेत सर्वजण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92156 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..