क्षयरोगमुक्त होणार शहर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षयरोगमुक्त होणार शहर
क्षयरोगमुक्त होणार शहर

क्षयरोगमुक्त होणार शहर

sakal_logo
By

कोल्हापूर क्षयरोगमुक्तच्या दिशेने

नवीन रुग्णांच्या संख्येत घट; जिल्हा सुवर्णपदकासाठी पात्र
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः दरवर्षीच्या सर्व्हेमधून जास्तीत जास्त रुग्ण शोधायचे, उपचार करून त्यांना बरे करायचे, नवीन रुग्ण सापडण्याच्या संख्येत होत असलेली घट, यासाठीच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर जिल्हा लवकर क्षयमुक्त होऊ शकतो, असा अंदाज राज्य क्षयरोग विभागाने व्यक्त केला आहे. नवीन रुग्ण सापडण्याच्या संख्येत ६० टक्के घट झाल्याने विभागाने जिल्ह्याला सुवर्णपदकासाठी पात्र ठरवले आहे. त्याची पडताळणी केंद्रीय विभागाच्या पथकाकडून केली जाणार आहे.
क्षयरोगमुक्त महाराष्ट्र करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. रुग्णापर्यंत यंत्रणा पोहचलीच नाही, तर हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी दरवर्षी सर्व ठिकाणी सर्व्हे करून रुग्ण शोधमोहीम राबवली जात आहे. यातून जितके संशयित आढळतील त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या उद्दिष्टामुळे शहरात पाच वर्षांत दरवर्षी एक हजारावर रुग्ण सापडले आहेत. यंदाही ऑगस्टपर्यंत हा आकडा ९६९ वर पोहचला आहे. जितके जास्त रुग्ण आढळतील तितका रोगाचा प्रसार रोखता येणार आहे, असे क्षयरोग विभागाचे मत आहे. या महिन्यात रुग्ण शोधण्यासाठी वार्षिक सर्वेक्षण होत असून क्षयरुग्ण सापडू शकतील, अशी शहरातील ४० ठिकाणे महापालिकेकडून निश्‍चित केली जात आहेत. ग्रामीणमध्ये सरसकट सर्व्हे केला जाणार आहे. काही वर्षांच्या आकडेवारीचा तसेच तिथून बरे होत असलेल्या रुग्णसंख्येचा अभ्यास करून राज्य क्षयरोग विभागाने जिल्हा क्षयरोगमुक्त होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. नवीन रुग्ण सापडण्यात ६० टक्के घट झाली असल्याने जिल्हा सुवर्णपदक मिळवण्यास पात्र असून त्यासाठी केंद्रीय क्षयरोग विभागाचे पथक येणार आहे.

कोट
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत रुग्णसंख्येत घट झाली असल्याने राज्य क्षयरोग विभागाने जिल्ह्याला सुवर्णपदकासाठी नामांकन दिले आहे. या पद्धतीने कामकाज सुरू असल्याने लवकरच जिल्हा क्षयरोगमुक्त होऊ शकतो.
- डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा क्षयरोग अधिकारी, कोल्हापूर

शहरातील रुग्ण
- वर्ष * रुग्ण
*२०१७- १०९१
*२०१८- १०७७,
*२०१९- १५८६
* २०२०- १४३४
* २०२१- १५३६
* २०२२- ९६९

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92266 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..