गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

46988
गडहिंग्लज : ओंकार महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना जावेद नदाफ. व्यासपीठावर स्वयंप्रभा सरमगदूम, डॉ. ज्ञानराजा चिघळीकर.

‘ओंकार’मध्ये प्रशिक्षण शिबिर
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना समन्वय समिती व विद्यार्थी विकास कक्षातर्फे प्रशिक्षण शिबिर झाले. कार्टून अनिमेशन कॉम्प्युटर एज्युकेशनच्या सहकार्याने झालेल्या या प्रशिक्षणात महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलतींबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. जावेद नदाफ यांनी मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य स्वयंप्रभा सरमगदूम यांचेही भाषण झाले. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघटनेच्या सचिव जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कविता पोळ यांनी आभार मानले.
-----------------
46989
गडहिंग्लज : ओंकार महाविद्यालयात विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करताना उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी.

रक्त तपासणी शिबिरास प्रतिसाद
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात क्रीडा विभाग व विद्यार्थी विकास कक्षातर्फे आयोजित रक्त तपासणी शिबिरास प्रतिसाद मिळाला. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाने सहकार्य केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयातील विकास माने, भगवान कुंभार, सुदर्शन पाटील, अमोल कांबळे यांनी तपासणी केली. संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर, प्रभारी प्राचार्य स्वयंप्रभा सरमगदूम, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. पी. पाटील, शारारिक शिक्षण संचालक सुरेश धुरे, विद्यार्थी विकास कक्षाचे समन्वयक डॉ. ज्ञानराजा चिघळीकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92329 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..