गावोगावी घुमू लागली गौराई गीते,शाळकरी मुली नटण्यात-सजण्यात गुंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावोगावी घुमू लागली गौराई गीते,शाळकरी मुली नटण्यात-सजण्यात गुंग
गावोगावी घुमू लागली गौराई गीते,शाळकरी मुली नटण्यात-सजण्यात गुंग

गावोगावी घुमू लागली गौराई गीते,शाळकरी मुली नटण्यात-सजण्यात गुंग

sakal_logo
By

01143
थेरगांव (ता. शाहूवाडी) ः येथे स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग ज्ञानोबा पाटील (थेरगावकर) यांच्या निवासी नामफलकाच्या अनावरणप्रसंगी अॅड. राहुल थोरात व मान्यवर.

तरुणांनी स्वातंत्र्यसैनिकांचे
स्मरण करावे; ॲड. राहुल थोरात

सरुड ः देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यसैनिकांनी अतुलनीय शौर्य गाजवले आणि मोठा त्याग केला, त्यांच्या स्वप्नातला भारत उभा करण्यासाठी आजच्या तरुण पिढीने कार्यरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन समाधान दूध संघाचे चेअरमन ॲड. राहुल थोरात यांनी केले. थेरगांव (ता. शाहूवाडी) येथे स्वातंत्र्यसेनानी कै. पांडुरंग ज्ञानोबा पाटील यांच्या निवासस्थानी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर उपक्रमांतर्गत स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग ज्ञानोबा पाटील (थेरगावकर) यांच्या निवासी नामफलकाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. राहुल पाटील यांनी स्वागत केले. ॲड. थोरात म्हणाले की, शाहूवाडी परिसरात स्वातंत्र्य चळवळ मोठ्या प्रमाणावर होती. या चळवळीतील सेनानींचे स्मरण करत आजच्या तरुणांनी देशाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचे वारस संजय पाटील, रणजीत यादव, किरण पाटील, देवेंद्र पाटील, प्रकाश बच्चे, प्रशांत पाटील, राहुल पाटील, ओमकार पाटील, मदन पाटील तसेच सरपंच शीतल घोलप आदी उपस्थित होते. चंद्रकांत रेडकर यांनी आभार मानले.

01756
निकमवाडी ः येथे गावाबाहेर नटून थटून शाळकरी मुली गौरीवाहन घेऊन जाताना.

गावोगावी बालगौरी सजू लागल्या
बोरपाडळे : कोरोना काळानंतर गणेशोत्सव उत्साहात साजरा होऊ लागला आहे. ‘श्री’ची आरती, पूजेसोबत पारंपरिक वाद्ये, लेझीम, हलगी-घुमके, ढोल-ताशे, बेंजो आदींच्या आयोजनात सगळे दंग आहेत. माहेरी आलेल्या माहेरवाशिणी आणि गावातील महिला गौरीच्या गीतांत गुंग झाल्या आहेत. गौरी गीतांचा पिंगा गल्लोगल्ली घुमू लागला आहे. शाळा-कॉलेजला सलग सुटी असल्याने मुले-मुली सणाचा आस्वाद घेत मामाच्या गावाला जायचा आनंद लुटत आहेत. विशेषतः मुली नटून-थटून गौराईचे वाहन घेऊन जाताना दिसत आहेत. गावाच्या बाहेर दुपारी शाळकरी मुली रस्त्यावरून गीते गाताना दिसत आहेत.

धुंदवडे शाळेचे एनएमएमएसमध्ये यश
असळज : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारतर्फे ८ वीमध्ये एनएमएमएस परीक्षा घेण्यात येते. ४८ हजार शिष्यवृत्ती मिळवून देणाऱ्या या परीक्षेत विद्या मंदिर धुंदवडे शाळेचे तब्बल २५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. जिल्हाभर उपक्रमशील शाळा म्हणून विद्या मंदिर धुंदवडे शाळा ओळखली जाते. शाळेचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात जिल्हा राज्य स्तरावर चमकले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा लांबली असताना देखील योग्य नियोजन, कार्यशाळेचे आयोजन, सातत्य, प्रश्नपत्रिका सराव मार्गदर्शनामुळे तब्बल २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला ४८ हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे. श्रेया चौधरी, प्रतीक्षा सूर्यवंशी, रेवती पाटील, उदय चौधरी, स्नेहा चौधरी, अमृता खोडके, अनुराधा पाटील, प्रतीक्षा पाटील, सानिका पाटील, मनीषा पाटील, ओंकार पोवार, साई मोहिते, विकास गुरव यांनी विशेष प्रावीण्य मिळवले, तर इतर विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
मुख्याध्यापक जी. एम. पालव व बी. व्ही. जाधव, श्रीपती तेली, संभाजी पाटील, सागर पाटील, एस. एस. पाच्छापुरे, एस. जे. भद्रोड, ए. डी. कांबळे, आर. आर. कागले, डी. एल. भोसले, रघुनाथ दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.

00558
00559
अध्यक्षपदी मनोज सूर्यवंशी
असळज : निवडे (ता. गगनबावडा) येथील विद्यामंदिर (नवीन वसाहत) च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मनोज गणपती सूर्यवंशी, तर उपाध्यक्षपदी शब्बीर करीम तरटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. समिती सदस्यपदी पांडुरंग पाटील, केरबा कांबळे, प्रतिक्षा लोखंडे, सोनल भालेकर, वैशाली पोवार, फरीदा बोबडे, सचिव मुख्याध्यापक महादेव शिरतोडे, विद्यालक्ष्मी शिंदे यांची निवड करण्ययात आली. यावेळी उपसरपंच महादेव लोखंडे, शिवाजी राऊत, बाबासो तरटे, अमर कांबळे, रफीक तरटे, बाळासो शेटे आदी उपस्थित होते. प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.

02513
एनएमएमएसमध्ये वैभवी राज्यात दुसरी
माजगाव ः आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेच्या (एनएमएमएस) २०२१-२२ मध्ये झालेल्या परीक्षेत कोतोली (ता. पन्हाळा) येथील नेहरू हायस्कूलची वैभवी शिवाजी पाटील हिने १७३ पैकी १६४ गुण मिळवून राज्यात दुसरा येण्याचा मान मिळविला. राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेण्यात आली होती. मुख्याध्यापक पी. एस. पोर्लेकर, प्रकाश गोते, प्रथमेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

03189 अमोल पालेकर
03188 आम्रपाली गायकवाड

जिल्हा उपाध्यक्षपदी पालेकर
पुनाळ : वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल पालेकर (कसबा ठाणे) यांची, तर महिला जिल्हा उपाध्यक्षपदी आम्रपाली गायकवाड (पोखले) यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हाध्यक्ष प्रा. विलास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. यात विविध निवडी झाल्या. कार्यकारिणी अशी : पन्हाळा तालुका उपाध्यक्ष दामाजी जाधव (यवलूज), सरदार कांबळे (म्हाळुंगे), गणेश कुंभार (आळवे), अक्षय कोळी (पडळ), पन्हाळा तालुका महासचिव गौतम कांबळे (देवठाणे), रणजीत कांबळे (म्हाळुंगे), आत्माराम कांबळे (पुशिरे).
यावेळी रावसाहेब निर्मळे, वैशाली कांबळे, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह वंचित पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


03833
मिणचे खुर्द (ता. भुदरगड) ः येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कारप्रसंगी मान्यवर.

मिणचेत ज्येष्ठ सेवाभावी संघाची स्थापना
कोनवडे : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथे सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघाची स्थापना झाली. काळम्मा देवी देवालयात संघामार्फत देशसेवा केलेल्या माजी सैनिक व काही विधवा पत्नींचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी महादेव सोकासने होते. भेदिक शाहीर डी. बी. नलवडे, शाहीर पाडुरंग देसाई यांच्या शाहिरी गाण्याने सुरवात झाली. त्यांना साथ एस. के. कांबळे, सुभाष नलवडे, पोपटराव कांबळे व ज्ञानदेव परीट यांची लाभली. यावेळी सरपंच जयश्री बाजीराव खेगडे व उपसरपंच सागर महादेव आडके प्रमुख उपस्थित होते. एस. के. कांबळे यांनी स्वागत केले.
यावेळी सुभेदार बच्चाराम देसाई, बचाराम खेगडे, रवींद्र देसाई, श्रीमती नीलम देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. बा. ई. सोकासने, के. डी. देसाई, शंकर दादू देसाई, पी. एस. सोकासने, शामराव कांबळे, ए. टी. पाटील, सुरेश गोविंद पाटील, अनुराज कांबळे, सिद्धार्थ कावळे, सुरेश देसाई यांचे सहकार्य लाभले. शामराव कांबळे यांनी आभार मानले.


02179
कोडोली ः प्रदीप पाटील (बाबा) प्रणित यशवंत शिक्षण समूह कर्मचारी क्रेडिट को-ऑप. पतसंस्थेस बोलताना बाळासाहेब पाटील. सोबत डॉ. मिलिंद गोडबोले, सुभाष जद व इतर मान्यवर.

यशवंत समूह सोसायटीला १५ लाखांचा नफा
कोडोली : येथील प्रदीप पाटील (बाबा) प्रणित यशवंत शिक्षण समूह कमर्चारी क्रेडिट को-ऑप. सोसायटीला १५ लाखांचा नफा झाला. नफ्यातून १२ टक्क्यांप्रमाणे लाभांशचे वाटप केल्याचे आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष बाळासो पाटील यांनी सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद गोडबोले होते.
माजी आमदार यशवंत पाटील व प्रदीप पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन तसेच दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरूवात झाली. सचिव रवींद्र शेटे यांनी स्वागत केले. बाळासो पाटील यांनी सांगितले, डॉ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेकडे ८.८० कोटींच्या ठेवी असून, ६.९१ कोटींची कर्जे वाटप केली. त्यातून १५.१२ लाखांचा नफा झाला आहे. संस्थेचा ‘एनपीए’ शून्य टक्के असून संस्थेस ऑडिट ‘अ’ वर्ग मिळाल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सुभाष विलास जद यांनी कर्जावरील व्याजदर एक टक्का कमी केल्याचे सांगितले. संचालक भगवान पाटील, पुंडलिक पाटील, रवींद्र पोवार, अरविंद पाटील, मोहन पाटील, बापूसो बच्चे, उत्तम बंडे, छाया पाटील, सुषमा पाटील, पुंडलिक पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92385 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..