जनावरांना लम्पी रोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनावरांना लम्पी रोग
जनावरांना लम्पी रोग

जनावरांना लम्पी रोग

sakal_logo
By

लम्पी त्वचारोग जनावरांसाठी जीवघेणा
दोन गावांतील जनावरांना लागण; दूध उत्पादनावर परिणाम
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः गाय किंवा म्हशीला ताप येतो, विविध अवयवावरील त्वचेवर गाठी येतात, कालांतराने म्हशी, गायी दूध कमी होते. आजाराची तीव्रता वाढल्यास वेळीच उपचार झाले नसल्यास जनावर दगावते. अशा लक्षणांचा लम्पी त्वचारोग दुभत्या जनावरांसाठी जीवघेणा ठरत आहे. अशा रोगांची लागण जिल्‍ह्यातील दोन गावांतील मोजक्या जनावरांना झाली आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन जनावराला उपचार दिल्यास भविष्यात या रोगाचा प्रसार रोखणे शक्य असल्याचे मत पशुवैद्यकांकडून व्यक्त होत आहे.
जिल्हाभरात जवळपास साडेआठ लाख जनावरे आहेत. त्यातील पाच लाखांवर गायी, म्हशी आहेत. लम्पी त्वचा रोग गायी, म्हशी व वासरांना होतो. पूर्वी हा रोग आफ्रिकेत आढळत होता. मात्र पाच वर्षापूर्वी भारतात ओरिसात आढळला. त्या पाठोपाठ, झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक राज्यातील जनावरांत दिसू लागला. जनावरांच्या बाजारातून परराज्यात विकलेल्या जनावरांकडून आजार राज्यात व कोल्हापूरपर्यंत पोहचला आहे.

असा पसरतो रोग
*लम्पी हा आजार संर्सगजन्य आहे
* एका जनावरांकडून दुसऱ्या जनावराला होतो
* लम्पीची झालेल्या जनावरांना त्या हातांनी दुसरे जनावराला हाताळले तर रोग होतो


लम्पी त्वचारोगाची लक्षणे
*गायी, म्हशीच्या अंगावर गाठी येतात
* माशा, डास, गोचिड, कीटक, चिलटे यातून संसर्गाचा प्रसार होतो
*बाधित जनावराला २ ते ५ आठवडे लक्षणे दिसत नाहीत. हा रोगाचा सुप्तकाळ असतो.
* तीव्र ताप येतो. डोळ्यातून पाणी, नाकातून स्त्राव येतो
* लसिका ग्रंथीना सूज येते. तोंडात व्रण येतात
* चारा खाण्यास त्रास होतो
*जनावराला फुप्फुसदाह, स्तनदाह सुरू होतो
* पायाला सूज आल्याने जनावर लंगडते.

उपाययोजना अशा
उपायाबाबत पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय ए. पठाण म्हणाले, ‘‘लम्पी त्वचारोग जनावरांकडून मानवाला होत नाही. तरीही हातमोजे घालून बाधित जनावरे हाताळावीत, लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय डॉक्टरांना जनावर दाखवावे, बाधित जनावरांचे दूध नष्‍ट करावे, गोठा परिसर हवेशी, निर्जंतुकीकरण करावे. बाधित जनावरांचे शेण, गोमूत्र खोलखड्ड्यात टाकावे, आजारी जनावरांना ‘आयवरमेक्टीन इंजेक्शन’ द्यावे, निरोगी जनावरांना लसीकरण करावे, निरोगी व बाधित जनावर स्वतंत्र ठेवावीत गोठ्यात नेहमी धुरी करावी.’

जनावरे बरी होतात
जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाची लागण सुरू झाली आहे. तातडीने उपाययोजना म्हणून ज्या गावात लागण आहे, तेथे दोन शासकीय पशुवैद्यकांची नियुक्ती करून जनावरांवर उपचार होत आहेतही जनावरे बरी होतील मात्र इतरांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असेही डॉ. पठाण यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92410 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..