निधन आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन आवश्‍यक
निधन आवश्‍यक

निधन आवश्‍यक

sakal_logo
By

४७०४४
मनोहर पंडत
कोल्हापूर, ता. १ ः रविवार पेठ, लक्ष्मीपुरी येथील मनोहर बाबूराव पंडत (वय ८२) यांचे निधन झाले. महापालिकेतून ते अधीक्षक पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे दोन मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

३१९५
सदाशिव पाटील
पुनाळ : माजनाळ (ता. पन्हाळा) येथील सदाशिव नारायण पाटील (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कुंभी साखर कारखान्याचे कर्मचारी भगवान पाटील यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन शुक्रवार (ता. २) रोजी सकाळी नऊ वाजता आहे.

२९५५
शामराव पाटील
सरवडे ः नरतवडे (ता. राधानगरी) येथील शामराव धोंडी पाटील (वय १०२) यांचे निधन झाले. त्यांचा मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रा. एम. आर. देसाई शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आनंदा पाटील यांचे वडील होत.

७२०८
दुल्लनबी बाणदार
घुणकी ः येथील दुल्लनबी अब्दुलरहीम बाणदार (वय ९२) यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परीवार आहे. जियारत विधी शुक्रवारी (ता. २) आहे.

२८४१
सर्जेराव हेगडे
कबनूर ः येथील ग्रामपंचायतीचे निवृत्त कर्मचारी सर्जेराव शामराव हेगडे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायतचे मुकादम अनिल हेगडे यांचे ते वडील होत.

१८१७
शिवाजी देसाई
नेसरी : तारेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सेवानिवृत्त बँक अधिकारी शिवाजी ऊर्फ सखाराम तुकाराम देसाई (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलगे, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार (ता. २) आहे.

३०७४
पंडित जाधव
उत्तूर ः येथील पंडित विठ्ठलराव जाधव (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे व तीन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ४) आहे.

47112
मनोहर कळेकर
गडहिंग्लज : येथील हिंदुस्थान पेपरचे मालक मनोहर शंकर कळेकर (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

02785
विलास ठमके
उजळाईवाडी ः गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील विलास विठ्ठल ठमके (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92422 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..