‘रवळनाथ’च्या सुविधा केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रवळनाथ’च्या सुविधा केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात
‘रवळनाथ’च्या सुविधा केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात

‘रवळनाथ’च्या सुविधा केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात

sakal_logo
By

47058
गडहिंग्लज : रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीच्या सुविधा केंद्राच्या वर्धापनदिन प्रसंगी डॉ. विजय तेजम, अर्चना तेजम, एम. एल. चौगुले, प्रा. व्ही. के. मायदेव, डॉ. आर. एस. निळपणकर, रेखा पोतदार आदी.

‘रवळनाथ’च्या सुविधा केंद्राचा
वर्धापनदिन उत्साहात
गडहिंग्लज : येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या प्रधान कार्यालयातील सुविधा केंद्राचा तिसरा वर्धापनदिन उत्साहात झाला. संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. संचालक मीना रिंगणे यांनी प्रास्ताविक केले. बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय तेजम व त्यांच्या पत्नी पॅथॉलॉजिस्ट अर्चना तेजम यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.
चौगुले म्हणाले, ‘‘परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी हे सुविधा केंद्र सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’ उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव, डॉ. आर. एस. निळपणकर, प्रा. विजय आरबोळे, महेश मजती, प्रा. एस. एन. देसाई, डॉ. संजय चौगुले, डॉ. समीधा चौगुले, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, शाखाधिकारी अशोक सुळकुडे आदी उपस्थित होते. प्रशासनाधिकारी सागर माने यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका रेखा पोतदार यांनी आभार मानले. दरम्यान, डॉ. रवींद्र हत्तरगी, तानाजी कोकितकर, राजू हंजी, काशिनाथ शेट्टी, बाळासाहेब गुरव, मनोहर गायकवाड, सुनील पट्टणशेट्टी, शीतल पाटणे, डॉ. राकेश बेळगुद्री यांनी सुविधा केंद्राला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92431 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..