पाऊस- १ सप्टेंबर २०२२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस- १ सप्टेंबर २०२२
पाऊस- १ सप्टेंबर २०२२

पाऊस- १ सप्टेंबर २०२२

sakal_logo
By

जोरदार पावसाची हुलकावणी
आजही अलर्ट; राजाराम बंधारा पाणीपातळी ११ फुटांवर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः शहरासह जिल्‍ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस झाला. दुपारी वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याचा अॅलर्ट होता. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. उद्या (ता. २) पुन्हा एकदा वादळी वाऱ्यांसह पाऊस होणार असल्याचा अॅलर्ट आहे. विशेष म्हणजे काल जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी ८ पर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १९.३ मिमी पाऊस झाला आहे. पंचगंगा नदीवरील कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर सायंकाळी सात वाजता ११ फूट ४ इंच पातळी होती. इचलकरंजी येथील बंधारा अद्यापही पाण्याखाली आहे. राधानगरी धरण ९५.४९ टक्के भरले असून तेथे ७.९८ टीएमसी साठा आहे.
काल आज आणि उद्या अशा तीनही दिवस वादळी वाऱ्यांसह पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्‍त केला होता. त्यानुसार काल सायंकाळी रिपरिप तर मध्यरात्री धुवाँधार पाऊस झाला. दिवसभराचा उष्मा यानंतर कमी झाला. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. दुपारी ऊन असल्यामुळे शहरात उष्मा वाढला होता. सायंकाळी पावसाच्या तुरळक सरी झाल्या. कालपर्यंत डोंगरी तालुक्यांतही पावसाने दडी मारली होती. मात्र, काल रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे प्रत्येक तालुक्यात चांगला पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस शिरोळ तालुक्यात झाला असून तेथे ४३.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सरासरी १९.३ मिमी पाऊस
जिल्ह्यात सकाळी आठपर्यंत संपलेल्या २४ तासांत झालेला सरासरी पाऊस मिमीमध्ये असा ः हातकणंगले- ३२.९, शिरोळ -४३.१, पन्हाळा- ९.१, शाहूवाडी- १२.६, राधानगरी- १२.६, गगनबावडा- ३४.३, करवीर- १५.१, कागल- ९.७, गडहिंग्लज- १९.२, भुदरगड- १४.२, आजरा- १३.५, चंदगड- २०.४. जिल्ह्यात एकूण सरासरी १९.३ मिमी पाऊस झाला.

दुपारी चार वाजता जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पातळी फुटांत अशी ः राजाराम ११.४, सुर्वे १३.११, रुई ४१, इचलकरंजी ३८, तेरवाड ३६.३, शिरोळ २६.३, नृसिंहवाडी २८.३, राजापूर १२.६ तर नजीकच्या सांगली ५.६ व अंकली ७.६ फूट अशी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92471 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..