स्मशानभूमी विस्तारीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमी विस्तारीकरण
स्मशानभूमी विस्तारीकरण

स्मशानभूमी विस्तारीकरण

sakal_logo
By

47117

स्मशानभूमी विस्तारीकरणाला एक कोटी

सतेज पाटील; एक कोटी उपलब्ध करण्याची मनपाला सूचना

कोल्हापूर, ता. १ ः पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणातील पहिल्या टप्प्यात १२ बेडच्या स्वतंत्र शेडबरोबरच रस्ता, स्वच्छतागृह, जादा वीजदिव्यांसाठी दोन कोटींचे नियोजन करण्याच्या सूचना आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आज दिल्या. स्वतःच्या व आमदार जयश्री जाधव यांच्या निधीतून प्रत्येकी ५० लाख देणार असून, महापालिकेने एक कोटीचा निधी उपलब्ध करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्वच्छतेबाबत सूचना केल्यानंतर अंमलबजावणी झाली की नाही हे पाहणार असून, महापालिकेच्या निधीबाबत प्रशासकांसमवेत बैठक घेण्यास माजी नगरसेवकांना सांगितले.
पंचगंगा स्मशानभूमीच्या सुरू असलेल्या दुरवस्थेबाबत आमदार पाटील, आमदार जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या माजी महापौर, माजी नगरसेवकांनी पाहणी केली. त्यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘‘सध्याचे शेड दुरुस्ती, स्मशानभूमीपासून बुधवार पेठेतील रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी रस्त्यावरील लाकडे हलवण्याच्या तसेच बाजपट्ट्यांसह सर्व रस्ता डांबरीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. अंधार जास्त असल्याच्या तक्रारी होत्या. त्यासाठी पाच लाखांचे वीजदिवे बसवण्यास सांगितले आहे. स्मशानभूमीतील पाण्याचा निचरा करण्याची गरज आहे. तसेच स्वच्छतागृहाची सुधारणा या कामांसाठी १ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यास महापालिकेला सांगितले आहे. जागा उपलब्ध करण्याचे प्रयत्न असून, तोपर्यंत पहिल्या टप्प्यात या सुधारणा केल्या जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी आर. के. पोवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी, शारंगधर देशमुख, प्रतापसिंह जाधव,
जय पटकारे यांनी कर्मचारी कमी असतात, वाहने लावण्यास जागा नसते, स्वच्छता नसते, अशा तक्रारी केल्या. त्यानंतर मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. विजय पाटील यांना आमदार पाटील यांनी प्रत्येक शिफ्टमध्ये किमान दोन कर्मचारी जादा द्या. स्वच्छता नियमित केली जावी, असे सांगितले.
यावेळी निलोफर आजरेकर, धनंजय सावंत, शशिकांत पाटील, अनिल पाटील, सुशील भांदिगरे, सुयोग मगदूम, आशपाक आजरेकर, फिरोज सरगूर आदी उपस्थित होते.
---
आमदार पाटील म्हणाले..
* स्मशानभूमी विस्तारीकरणाचा आराखडा ५० कोटींचा
*स्मशानभूमीच्या कार्यालयाजवळ ९ गुंठे जागेत २४ बेडचे शेड उभारणार
*पहिल्या टप्प्यात १२ बेड उभे केले जातील.
*आमदार पाटील आणि आमदार जाधव यांच्या निधीतून प्रत्येकी ५० लाख, असे १ कोटी


गॅस दाहिनी दहा दिवसांत सुरू
गॅसदाहिनी तांत्रिक बिघाडाने बंद असल्याचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. पाटील यांनी सांगितले. त्याची दुरुस्ती करून दहा दिवसांत सुरू करण्याची सूचना आमदार पाटील यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92482 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..