२७ टक्के मतदार-आधार नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२७ टक्के मतदार-आधार नोंदणी
२७ टक्के मतदार-आधार नोंदणी

२७ टक्के मतदार-आधार नोंदणी

sakal_logo
By

‘मतदार’ला ‘आधार’
लिंकसाठी जनजागृती करा
जिल्हाधिकारी कार्यालायात अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्यात जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथून पुढे आणखी जोडण्या वाढविण्यासाठी शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्येही बूथ तयार करून जनजागृती करण्याच्या सूचना आज उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात ही अधिकाऱ्यांची बैठक झाली.
राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याचे काम सुरू आहे. यात जिल्ह्यात आजपर्यंत २७.१५ टक्के मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडले आहेत. जिल्ह्यात एकूण ८ लाख ५७ हजार ४४७ मतदार आहेत. त्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय यंत्रणा आणखी सक्षम करण्याच्याही सूचना श्री. कांबळे यांनी दिल्या. मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत सर्वांनी योगदान देऊन शक्य तेथे बूथ उभा करून जोडण्या पूर्ण कराव्यात. जोडण्या पूर्ण करण्यात सातारा जिल्हा पहिला तर परभणी जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे याचीही माहिती श्री. कांबळे यांनी बैठकीत दिली.
बैठकीस समाजकल्याण, पंचायत समिती, शिवाजी विद्यापीठ, अग्रणी बॅंक, नगरपालिका, महापालिका, कामगार कल्याण, नेहरू युवा केंद्र, महानगरपालिका यांच्यासह सुमारे २५ कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92483 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..